18.6 C
Latur
Thursday, February 2, 2023
Homeक्रीडारोहितने मोडला जयसुर्याचा विक्रम

रोहितने मोडला जयसुर्याचा विक्रम

एकमत ऑनलाईन

इंदूर : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आणखी एक अप्रतिम रेकॉर्ड नावावर केला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तो जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे. यादरम्यान त्याने श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्याचा विक्रम मोडला. सामन्यापूर्वी रोहितला जयसूर्याचा विक्रम मोडण्यासाठी चार षटकारांची गरज होती.

डावाची सुरुवात करण्यासाठी आल्याआल्याच हिटमॅनने जयसूर्याला मागे टाकले. जयसूर्याने एकदिवसीय कारकिर्दीत २७० षटकार ठोकले होते. त्याच वेळी, रोहितने आता वनडे क्रिकेटमध्ये २७३ षटकार ठोकले आहेत. इंदूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात रोहितने शतक ठोकले असून बऱ्याच काळानंतर त्याने सेन्चूरी ठोकली आहे. रोहित ८५ चेंडूत १०१ धावा केल्या. यावेळी त्याने ६ षटकार आणि ९ चौकार ठोकले.

सर्वाधिक षटकारांचा खास रेकॉर्ड
वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. आफ्रिदीने ३९८ एकदिवसीय सामन्यांच्या ३६९ डावांमध्ये फलंदाजी करताना सर्वाधिक ३५१ षटकार मारले होते. शाहिद आफ्रिदी जवळपास १९ वर्षे पाकिस्तानकडून खेळला. वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल दुसऱ्या क्रमांकावर आहे. युनिव्हर्सल बॉसने ३०१ एकदिवसीय सामन्यांच्या २९४ डावांमध्ये ३३१ षटकार मारले. तर श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्याने ४४५ एकदिवसीय सामन्यांच्या ४३३ डावांमध्ये २७० षटकार ठोकले आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या