23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्ररोहित पाटील यांची विजयी घोडदौड कायम

रोहित पाटील यांची विजयी घोडदौड कायम

एकमत ऑनलाईन

किदरवाडी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा
सांगली : आर. आर. आबांच्या जाण्यानंतर सांगली राष्ट्रवादीत मोठी पोकळी निर्माण झाली. अशात त्यांचे पुत्र रोहित पाटील जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाले अन् एकापाठोपाठ एक विजय राष्ट्रवादीच्या पारड्यात खेचून आणण्यात यशस्वी झाले आहेत. कवठेमहांकाळ नगर परिषद निवडणुकीनंतर आता ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ते विजयाची माळ राष्ट्रवादीच्या गळ्यात घालताना दिसत आहेत.

भाजपचे खासदार संजय काका पाटील यांना पुन्हा एकदा धक्का देत किदरवाडी ग्रामपंचायतीवर रोहित यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांना धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रोहित आर. आर. पाटील यांनी पुन्हा बाजी मारत किदरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवली आहे. रोहित आर. आर. पाटील यांच्या पॅनलचे ७च्या ७ सर्व उमेदवार निवडून आले आहेत. तर संजयकाका पाटील यांच्या पॅनलच्या अनेक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करत भाजपच्या पॅनलचा दारुण पराभव केला आहे.

सांगली जिल्ह्यातील एकमेव किदरवाडी ग्रामपंचायतच्या निवडणुकीची आज मतमोजणी शांततेत पार पडली.आज सकाळी तासगाव तहसीलदार कार्यालयावर मतमोजणी पार पडली. कोणताही गोंधळ झाला नाही. एकूण मतदारसंख्या ६७७ असून ३७८ जणांनी मतदान केले होते. ३ प्रभागांमध्ये ७ जागांसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. या निवडणुकीत ५५ टक्के मतदान झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोहित आर. आर. पाटील यांचे पॅनल विरुद्ध भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत होती. या निवडणुकीत दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र यात रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे.

कवठेमहांकाळ नगर परिषद निवडणुकीनंतर आता ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ते विजयाची माळ राष्ट्रवादीच्या गळ्यात घालताना दिसत आहेत. भाजपच्या खासदार संजय काका पाटील यांना पुन्हा एकदा धक्का देत किदरवाडी ग्रामपंचायतीवर रोहित यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे.

रोहित आर. आर. पाटील यांच्या पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आले आहेत तर संजय काका पाटील यांच्या पॅनलच्या अनेक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असून भाजपच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या