मुंबई : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज रोहित शर्माने पत्नी रितिका सजदेहसाठी एक भावनिक संदेश लिहिला आहे. या संदेशासोबत रोहितने इंस्टाग्रामवर रितिकासमवेत एक फोटो पोस्ट केला. या पोस्टमध्ये रोहित म्हणाला, ‘असं म्हणतात की शिकणं कधीच थांबत नाही.
Read More नियमाचे उल्लंघन करणा-यांना दिल्ली पोलिसांनी शिकवला धडा
यावेळी आपण एकमेकांना अधिक समजून घेण्यास आणि शिकण्यास सक्षम झालो आहोत. याबद्दल मी कृतज्ञ आहे. एकत्र नसताना आपण काय पाठी सोडलंय हे मला या परिस्थितीने सांगितलं आहे.’ रोहित शर्माने नुकतेच युवराज सिंगचे ‘स्टे होम’चॅलेंज पूर्ण केले आहे. युवराजने सोशल मीडियावर ‘किप इट चायलेंज’ ही मोहीम सुरू केली आहे. युवीने एक व्हिडिओच्या माध्यमातून, बॅट उभी धरून बॅटच्या कडेने चेंडू शक्य तितक्या वेळ टोलवत राहणे, असे चॅलेज दिले आहे. रोहितने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये रोहितने हे चॅलेंज पूर्ण केल्याचे सांगत पंत, रहाणे आणि अय्यर यांना नॉमिनेट केले आहे.