19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeराष्ट्रीयभारतीय नौदलात लवकरच ‘रोमिओ’ची एन्ट्री

भारतीय नौदलात लवकरच ‘रोमिओ’ची एन्ट्री

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारतीय नौदलासाठी एमएच-६० रोमियो (एमएच-६०आर) हे हेलिकॉप्टर तयार केले जात आहे. नुकताच या हेलिकॉप्टरचा लुक समोर आला आहे. अमेरीकन कंपनी लॉकहिड मार्टिनने शुक्रवारी भारतीय नौदल दिनानिमित्त एमएच-६० रोमियो या हेलिकॉप्टरचा फोटो शेअर केला होता. हिंद महासागरात चीनचे सामर्थ्य वाढले आहे. चीनची वाढती ताकद पाहता भारताने अमेरीकन कंपनी लॉकहीड मार्टिनशी संपर्क करुन या हेलिकॉप्टरसाठीचा करार केला आहे. गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट करारानुसार लॉकहीड मार्टिन कंपनीला २४ हेलिकॉप्टर बनवण्याची ऑर्डर दिली आहे. हे आतापर्यंतचे सर्वात अपग्रेडेड हेलिकॉप्टर असणार आहे. यामध्ये असे काही फिचर्स आहेत, जे यापूर्वी कोणत्याही लढाऊ हेलिकॉप्टरमध्ये पाहायला मिळाले नव्हते. अमेरिकन सैन्य या हेलिकॉप्टरचा वापर आधीपासूनच करत आहे.

हे हेलिकॉप्टर खास नौदलासाठी डिझाईन केले जात आहे. हे हेलिकॉप्टर समुद्रात लपलेल्या शत्रूच्या पाणबुड्या शोधण्यात आणि ते त्या पाणबुड्या नेस्तनाबूत करण्यास सक्षम आहे. या हेलिकॉप्टरमध्ये अनेक असे रडार आहेत़ ज्याद्वारे खोल समुद्रात लपलेल्या पाणबुड्या शोधता येतील आणि त्यांना लक्ष्य करुन त्या उद्ध्वस्त करता येतील.

युध्दनौका, पाणबुड्या नष्ट करण्यात सक्षम
या हेलिकॉप्टरमध्ये हेल्प फायर मिसाईल्स, एमके-५४ टॉरपिडो आणि रॉकेटदेखील आहे. ही हत्यारे शत्रूच्या युद्धनौका नष्ट करण्यास सक्षम आहेत. रोमियो हेलिकॉप्टर वेगळ्या पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे. जेणेकरुन रोमियो हेलिकॉप्टरमध्ये एसएच-६० बी आणि एसएच-६० एफ हेलिकॉप्टर्सच्या फिचर्सचा समावेश करता येईल.

२७०० किग़्रॅ़ वजन उचलण्याची क्षमता
हे हेलिकॉप्टर उडवणारा पायलट रात्रीच्या गडद अंधारातही अचूकपणे लक्ष्यभेद करु शकतो. हे हेलिकॉप्टर तब्बल २७०० किलोग्रॅमपर्यंत वजन उचलू शकते. या फायटर हेलिकॉप्टरमध्ये दोन इंजिन देण्यात आले आहेत. ज्यामुळे हे हेलिकॉप्टर तब्बल ३३० किमी प्रति तास वेगाने उडू शकते. या हेलिकॉप्टरची रेंज ८३० किलोमीटरपर्यंत आहे.

मल्टिटास्किंग लढाऊ हेलिकॉप्टर
रोमियो या हेलिकॉप्टरचा वापर भारतीय नौदल सुरक्षेसह दळणवळण, मेडिकल सुविधा पुरवणे, रेस्क्यू ऑपरेशनसाठी करु शकते. हे एक मल्टिटास्किंग लढाऊ हेलिकॉप्टर सिद्ध होईल. लॉकहिड मार्टिनने शेअर केलेला फोटो हा मॅन्यूफॅक्चरिंग फर्ममधील आहे. लवकरच हे हेलिकॉप्टर तयार होईल आणि भारतीय नौदलात त्याचा समावेश केला जाईल.

सरकार स्थीर ठेवायचे असेल तर आमच्या नेत्याविषयी अपशब्द टाळा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या