27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeआंतरराष्ट्रीयरोनाल्डो सर्वांत जास्त कमाई करणारा फुटबॉलर

रोनाल्डो सर्वांत जास्त कमाई करणारा फुटबॉलर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ‘फोर्ब्ज’ने २०२१ मध्ये सर्वांत जास्त कमाई करणा-या फुटबॉलर्सची यादी जाहीर केली आहे. यात पोर्तुगालचा क्रिस्टीयानो रोनाल्डो १२५ मिलियन डॉलर(९२२ कोटी रुपये) कमाईसोबत टॉपवर आहे. तर दुस-या क्रमांकावर अर्जेंटीनाचा लिओनेल मेस्सी आहे ज्याने ११० मिलियन डॉलर(८११ कोटी रुपये) कमावले. मँचेस्टर युनायटेडचा स्ट्रायकर रोनाल्डोची कमाई गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढली आहे. रोनाल्डोने २०२० मध्ये ५८५ कोटी रुपये कमावले होते. यावर्षी त्याची ६४ कोटी रुपयांनी कमाई वाढली.

रोनाल्डोचा पगार ७० मिलियन डॉलर आहे. तर त्याने जाहिरातींमधून ५५ मिलियन डॉलरची कमाई केली. बार्सिलोना सोडून पॅरिस सेंट जर्मेनशी जुळणा-या लिओनेल मेस्सीची कमाई यावर्षी घटली. गेल्यावर्षी मेस्सीने ९२४ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर यावर्षी त्याने ८११ कोटी रुपये कमावले. मेस्सीची सॅलरी ७५ मिलियन डॉलर आहे तर त्याने जाहिरातींमधून ३५ मिलियन डॉलरची कमाई केली. सॅलरीच्या बाबतीत मेस्सी आताही रोनाल्डोच्या पुढे आहे. पण जाहिरात विश्वावर रोनाल्डोचा जलवा आहे.

या यादीत तिस-या स्थानावर ब्राझीलचा सुपरस्टार फुटबॉलर नेमार आहे. नेमारने यावर्षी ९५ मिलियन डॉलर(७०१ कोटी रुपये) कमाई केली आहे. गेल्यावर्षी त्याने ७०४ कोटी रुपयांची कमाई केली होती. नेमारला ७५ मिलियन डॉलर सॅलरी आहे तर २० मिलियन डॉलर त्याने जाहिरातीतून कमावले.
२२ वर्षीय किलियन एमबापे सध्या फ्रेंच क्लब पीएसजीसाठी खेळतो. फ्रान्सीसी फुटबॉलरने यावर्षी ४३ मिलियन डॉलर (३१७ कोटी रुपये) कमाई केली. याचीही कमाई गेल्यावर्षीच्या तुलनेत घटली आहे.

‘फोर्ब्ज’ यादीत पाचव्या क्रमांकावर लिव्हरपूलचा स्टार खेळाडू मोहम्मद सालाह आहे. त्याने यावर्षी ४२ मिलियन डॉलर(३०२ कोटी रुपये)ची कमाई केली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत सालाहची कमाई ३१ कोटी रुपयांनी वाढली आहे. सालाहने २०२० मध्ये २७१ कोटी रुपये कमाई केली होती.
या यादीत ७व्या क्रमांकावर आहे स्पेनचा आंद्रे इनिएस्ता. त्याची कमाई ३७ मिलियन डॉलर(२७२ कोटी रुपये). त्यानंतर ८व्या क्रमांकावर पॉल पोग्बा (२५० कोटी रुपये), ९व्या क्रमांकावर गेरेथ बेल (२३६ कोटी रुपये) आणि १०व्या क्रमांकावर एडेन हेजार्ड (२१३ कोटी रुपये) आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या