23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमनोरंजनअनुष्का प्रेग्नेंट ही अफवाच !

अनुष्का प्रेग्नेंट ही अफवाच !

एकमत ऑनलाईन

मुंबई : अनुष्का शर्मा दुस-यांदा प्रेग्नेंट आहे अशी बातमी वा-यासारखी पसरली होती, पण आता कळतंय ती निव्वळ अफवाच होती. मालदीवहून परत आल्यानंतर अनुष्का आणि विराटने तातडीने रुग्णालय गाठल्याने चाहते थोडे चिंतेत होते. पण जेव्हा दोघांचा रुग्णालयाबाहेर पडतानाचा हसरा चेहरा सगळ्यांनी पाहिला तेव्हा चाहत्यांनी आनंदात चक्क स्वघोषित करून टाकले की त्यांची लाडकी अभिनेत्री अनुष्का प्रेग्नेंट आहे.

अन् मग काय बातमीला जणू पाय लागल्यासारखी ती इकडून-तिकडे पळत सुटली. पण आता कानावर पडतंय की मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात अनुष्का आणि विराट फिजिओथेरपिस्टकडे गेले होते, पण का?

कोकिलाबेन अंबानी रुग्णालयही अनुष्का प्रेग्नेंट आहे ही बातमी पसरल्यानं चर्चेत आलं होतं. सोशल मीडियावर अनुष्का-विराटसोबत कोकिलाबेन रुग्णालयाची देखील हवा झालेली आपण पाहिली. पण तिथे अनुष्का फिजिओथेरपिस्टकडे का गेली होती या कारणाचा खुलासा झाला आहे.

अनुष्काचा लवकरच ‘चकदा एक्सप्रेस’ सिनेमा येत आहे. ज्यात ती महिला क्रिकेटर झूलन गोस्वामी यांची भूमिका साकारत आहे. यात ती आपल्याला जोरदार गोलंदाजी करताना दिसणार आहे. आता हा रोल स्पोर्टवूमन नसलेल्या अनुष्कासाठी खूपच चॅलेंजिंग असणार यात शंकाच नाही

. अशामध्ये सीनसाठी का होईना पण खरोखरची गोलंदाजी तिला करावी लागतेय अन् त्यामुळे मग शरीराची जी काळजी गरजेनुसार घ्यावी लागते हे सगळं तिलाही करावं लागत आहे. स्ट्रेचिंग, रनिंग, डायव्हिंग हे सगळं त्यात आलंच. एखादा खेळ खेळताना शरीराला त्यासाठी तयार ठेवणं, त्यामुळे होणा-या दुखण्याला कंट्रोलमध्ये ठेवणं या गोष्टी देखील कटाक्षाने पाळाव्या लागतात.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या