27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeरूपर्ट मरडॉक ९१व्या वर्षी घेतोय घटस्फोट

रूपर्ट मरडॉक ९१व्या वर्षी घेतोय घटस्फोट

एकमत ऑनलाईन

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या मीडिया क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्त्व असलेले रुपर्ट मरडॉक कायम कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरुन चर्चेत असतात.

९१ वर्षांचे असलेले रुपर्ट मरडॉक पुन्हा एकदा त्यांच्या वैवाहीक जीवनावरुन चर्चेत आले. त्यांनी आतापर्यंत चार लग्न केले. मात्र आता वयाच्या ९१ व्या वर्षी ते पुन्हा एकदा त्यांच्या चौथ्या बायकोपासून घटस्फोट घेत आहेत.

मरडॉकने पॅट्रिशिया बुकर हिच्याशी १९५६ मध्ये पहिल्यांदा लग्न केले होते. ११ वर्षं त्यांचे पहिले लग्न टिकले. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी ऍना मारिया टोव हिच्याशी दुसरे लग्न केले. १९९९ पर्यंत दुस-या पत्नीसोबत होते मात्र नंतर तिलाही घटस्फोट दिला. १९९९ मध्ये त्यांनी वेंडी डेंग हिच्याशी तिसरे लग्न केले.

१४ वर्षांनी या दोघांनीही घटस्फोट घेतला तर यानंतर २०१६ मध्ये मरडॉक यांनी जेरी हॉल हिच्याशी लग्न केले. मात्र आता हे घटस्फोट घेत आहेत. वयाच्या ९१ व्या वर्षी घटस्फोट घेणारे रूपर्ट मरडॉक हे कदाचित पहिलेच व्यक्ती असावेत, त्यामुळे हे प्रकरण विशेष चर्चेत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या