26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeराष्ट्रीयसचिन पायलट गटाचा फोन टॅपिंगचा आरोप

सचिन पायलट गटाचा फोन टॅपिंगचा आरोप

एकमत ऑनलाईन

जयपूर : काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्या नाराजीच्या चर्चेनंतर राजस्थानमधील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर पुन्हा एकदा फोन टॅपिंगचा आरोप होत आहे. जयपूर जिल्ह्यातील चाक्सूचे काँग्रेस आमदार वेद प्रकाश सोलंकी यांनी दावा केला की, काही आमदारांचे फोन टॅपिंग केले जात आहे. विशेष म्हणजे वेद प्रकाश सोलंकी सचिन पायलट यांचे कट्टर समर्थक आहेत.

काही आमदारांनी मला त्यांचे फोन टॅपिंग होत असल्याचे सांगितले, असा दावा सोलंकी यांनी केला आहे. पण, आमदारांची नावे त्यांनी जाहीर केली नाहीत. सोलंकी यांनी असेही स्पष्ट केले की, फोनचे टॅपिंग कोण करत आहे आणि कोणाच्या आदेशानुसार करतेय हे माहिती नाही. माझे फोन टॅपिंग होत आहे का नाही हे मला माहिती नाही. तसेच याप्रकरणी राज्य सरकारचा कितपत हात आहे, हेही मला माहिती नाही. पण, काही आमदारांनी मला सांगितले की, त्यांचे फोन टॅपिंग होत आहे.

सोलंकींनी सांगितले की, आमदारांनी फोन टॅपिंग ओळखण्यासाठी एका अ‍ॅपची मदत घेतली होती. काही आमदारांनी याबाबत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही माहिती दिली. पण, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आमदारांनी सांगितले की, पोलिस आणि गुप्तहेर अधिकारी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. सोलंकी यांना विचारण्यात आले की, हे आमदार सचिन पायलट गटातील आहेत काय? यावर सोलंकी म्हणाले की, ते काँग्रेस आमदार आहेत.

आरोप पूर्णपणे तथ्यहीन
सोलंकी यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना महेश जोशी म्हणाले की, आरोप पूर्णपणे तथ्यहीन आहेत. एका जबाबदार नेत्याने कोणत्याही पुराव्याशिवाय असे आरोप करणे चुकीचे आहे. भाजपने या मुद्यावरुन काँग्रेसवर निशाणा साधला. अनेक काँग्रेस आमदार फोन टॅपिंगचा दावा करत आहेत. हे कोण आमदार आहेत पक्षाने स्पष्ट करावे. काँग्रेस स्वत:च्या आमदारांचे फोन टॅपिंग का करत आहे, असा सवाल भाजप राज्य अध्यक्ष सतीश पुनिया यांनी ट्विट करुन म्हटले.

फसवणूक करणा-या आघाडी शासनाविरुध्­द संघर्ष करु-माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या