34.2 C
Latur
Thursday, June 1, 2023
Homeसचिन तेंडुलकरने कुटुंबियांसाठी बनवली मँगो कुल्फी

सचिन तेंडुलकरने कुटुंबियांसाठी बनवली मँगो कुल्फी

एकमत ऑनलाईन

लग्नाचा २५ वा वाढदिवस : आपल्या कुटुंबियांचे तोंड गोड करण्यासाठी स्वतः बनला शेफ 

मुंबई : सध्या लॉकडाऊनच्या काळात वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, सणवार, गेट टुगेदर असे सर्वच कार्यक्रम घरच्या घरी होत आहेत. बहुतांश लोकं घरीच खास क्षणांना आवडत्या पदार्थांची रेसिपी बनवून आपल्या कुटुंबियांना आनंदी ठेवत आहेत. असाच सुंदर प्रयत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही केला आहे. आज सचिन आणि अंजली यांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस असून या निमित्ताने सचिनने कुटुंबियांसाठी खास मँगो कुल्फीचा बेत आखला आहे. सचिनने स्वतः मँगो कुल्फी बनवली असून ही रेसिपी त्याने चाहत्यांसोबतही शेअर केली आहे. यावेळी सचिनची आईदेखील त्याच्या मदतीसाठी किचनमध्ये उपस्थित असून ती आज त्यांना बटाट्याच्या भरीताची रेसिपी शिकवणार असल्याचे गमतीने सांगत आहे. अशा खेळीमेळीच्या वातावरणात सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबियांचे तोंड गोड करण्यासाठी स्वतः शेफ बनला आहे.

Read More  सरसेनापती हंबीरराव चित्रपटाचे ४ हजार स्क्वेअर फुटांमध्ये ग्रास पेंटिंग

सचिन बनला हेअर स्टायलिश
यापूर्वीही सचिनने हातात कात्री घेऊन घरातच हेअर कटिंगचा प्रयोग करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. लॉकडाऊनमुळे सर्व सलून, पार्लर बंद आहेत. अशात भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर हेअर स्टायलिस्ट बनला होता. आपला मुलगा अर्जुनचे केस कापतानाचा एक व्हिडीओ सचिनने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सचिन तेंडुलकर आधीपासूनच सक्रीय आहे. त्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्यापासून ते अनेक संस्थांच्या स्वच्छताविषक उपक्रमात सचिन सहभागी झाला आहे. तसेच सुरुवातीपासूनच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे देखील सचिन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या