26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रसदा सरवणकरांचे पिस्तूल जप्त; प्रभादेवी राडा प्रकरणी पोलिसांची कारवाई

सदा सरवणकरांचे पिस्तूल जप्त; प्रभादेवी राडा प्रकरणी पोलिसांची कारवाई

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईत प्रभादेवी येथील शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राड्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. यामध्ये पोलिस ठाण्याच्या आवारात झालेल्या गोळीबारप्रकरणी आमदार सदा सरवणकर यांची पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. तसेच, पोलिसांकडून त्यांना समन्सदेखील बजावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

गणपती विसर्जनादरम्यान एकमेकांना डिवचल्याच्या रागातून शनिवारी रात्री प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गटात हाणामारी झाली. दादर पोलिस दोन्ही गटांविरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास करीत आहेत. यामध्ये पोलिस ठाण्याबाहेर जमलेल्या गर्दी दरम्यान, सरवणकर यांनी एक गोळी जमिनीच्या दिशेने झाडल्यामुळे खळबळ उडाली.

पोलिस ठाण्याच्या आवारात असलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागल्यामुळे गोळीबार झाल्याची जवळजवळ खात्री पटली आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. या सबळ पुराव्यावरून दादर पोलिसांनी शिंदे गटातील आमदार सदा सरवणकरसह इतर १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यात आर्म्स कायदा (शस्त्र अधिनियम कायदा) कलम लावण्यात आला आहे.

दादर पोलिसांनी शनिवारी रात्री ठाकरे गटावर गुन्हा दाखल करून विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह ५ जणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध दंगलीसह जबरी चोरीचे कलम लावण्यात आले होते. मात्र तपासात जबरी चोरी झाली नसल्याचे समोर आले असून ३९५ हे कलम काढण्यात आले आहे. त्यांची वैयक्तिक जामिनावर पोलिस ठाण्यातून सुटका करण्यात येणार असल्याचे समजते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या