Tuesday, September 26, 2023

सईद अन्वरचे द्विशतकाचे स्वप्न भंगले

सचिन तेंडुलकरने २०१० मध्ये द्विशतक करीत अन्वरचा १९४ धावांचा विक्रम मागे टाकला
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक झळकावणाºया भारताच्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एका फलंदाजाचे द्विशतक करण्याचे स्वप्न भंग केले होते. पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज सईद अन्वरने २० मे १९९७ रोजी वन डे क्रिकेटमध्ये इतिहास रचला होता. चेन्नईत झालेल्या या सामन्यात अन्वरने भारताविरुद्ध १९४ धावांची खेळी केली होती. अन्वरने केलेल्या १९४ धावा या तेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एका फलंदाजाकडून करण्यात आलेली सर्वोच्च खेळी होती.

Read More  चीन-भारत सीमावाद : भारताच्या बाजूने उभी राहणार अमेरिका

त्याने व्हीव्हीएन रिचर्डस्च्या १८९ धावांचा विक्रम मागे टाकला होता. रिचर्डस् यांनी १९८४ मध्ये इंग्लंडविरुद्ध ही खेळी केली होती. अन्वरने त्याच्या या खेळीत २२ चौकार आणि पाच षटकार मारले होते. त्याने अनिल कुंबळेच्या गोलंदाजीवर सलग ३ षटकार मारले होते. जेव्हा अन्वर २०० धावांच्या जवळ पोहोचला तेव्हा सचिन तेंडुलकरच्या चेंडूवर तो बाद झाला आणि सौरव गांगुलीने त्याचा कॅच घेतला होता. अन्वरने १४६ चेंडूत २०६ मिनिटे फलंदाजी केली. या खेळीत अधिक वेळ शाहिद आफ्रिदीने अन्वरच्या वतीने रनर म्हणून काम केले. चेन्नईतील उष्णता आणि डाव्या हाताने फलंदाजी करण्याचा फायदा अन्वरला मिळाला.

अन्वरनंतर झिम्बाब्वेच्या चार्ल्स कॉन्वेट्रीने १६ आॅगस्ट २००९ रोजी त्याच्या या विक्रमाशी बरोबरी केली. अन्वरच्या या खेळीने पाकिस्ताने ५० षटकांत ५ बाद ३२७ धावा केल्या. गमतीचा भाग म्हणजे पाकिस्तानकडून सर्वाेच्च धावसंख्या १९४ होती तर दुसºया क्रमांकाची धावसंख्या ३९ इतकी होती. भारताला या सामन्यात ४९.२ षटकांत सर्वबाद २९२ धावा करता आल्या आणि पाकने हा ३५ धावांनी विजय मिळवला. अन्वरचा १९४ धावांचा विक्रम भारताच्या सचिन तेंडुलकरने २०१० मध्ये द्विशतक करत मागे टाकला. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ग्वालियर येथे ही खेळी केली. पुरुषांच्या वनडेत द्विशतक करणारा सचिन पहिला फलंदाज होता.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या