24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रसागर बंगल्यावर वॉशिंग मशीनचेकाम चालत असेल; रश्मी शुक्ला-फडणवीस भेटीवर काँग्रेसचे टीकास्त्र

सागर बंगल्यावर वॉशिंग मशीनचेकाम चालत असेल; रश्मी शुक्ला-फडणवीस भेटीवर काँग्रेसचे टीकास्त्र

एकमत ऑनलाईन

मुंबई : अधिवेशनात नुकसानग्रस्त शेतक-यांना मदत देण्याची आज मागणी करणार आहे. सध्या राज्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारनं शेतक-यांच्या मागे उभे राहावे, असे आवाहन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

तसेच, काल सागर बंगल्यावर फोन टॅपिंग प्रकरणात अडचणीत सापडलेल्या रश्मी शुक्ला आणि मोहित कंबोज यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्याबाबत बोलताना सागर बंगला कदाचित वॉशिंग मशिनसारखे काम करत असेल, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी चिमटा काढला आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, सध्या राज्यात जे घटते आहे. ते लोकशाहीला हानिकारक आहे. हे सर्व आपल्या राज्यघटनेप्रमाणे नाही. त्यामुळे आम्हा सर्वांना एकत्र येऊन याचा विरोध करावा लागणार आहे.तसेच, पुढे बोलताना त्यांनी फोन टॅपिंग प्रकरणी अडचणीत सापडलेल्या रश्मी शुक्ला यांनी सागर बंगल्यावर मोहित कंबोज यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, यावरुन चिमटा काढला आहे. सागर बंगला कदाचित वॉशिंग मिशनसारखे काम करतो, असे ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या