22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रसाहेब जैसा जैसा बोले, हा तैसा तैसा चाले... उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर मनसेची...

साहेब जैसा जैसा बोले, हा तैसा तैसा चाले… उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर मनसेची टीका

एकमत ऑनलाईन

मुंबई :  सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी राऊतांनी अनेक प्रश्न विचारले. त्या प्रश्नांवर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली आहे.

दरम्यान, मनसेने या मुलाखतीवर ‘कार्टून’ शेअर करत टीका केली आहे. संदीप देशपांडे यांनी एक व्यंगचित्र शेअर केले आहे. यात मुलाखतीसाठीचा स्टुडिओ दिसतोय. मुलाखतीला सुरुवात करण्याआधी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंमधील संवाद दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कार्टूनमध्ये संजय राऊतांच्या हातामध्ये घड्याळ दाखवण्यात आले आहे.

त्यामुळे या कार्टूनद्वारे केवळ राऊत, ठाकरेंसह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे.
‘‘हे घ्या साहेबांनी पाठवलेले मुलाखतीसाठीचे प्रश्न आणि उत्तरं’’, असे संजय राऊत म्हणतात. त्यावर ‘‘बघा आता कशी देतो मी खणखणीत उत्तरं’’, असे उद्धव ठाकरे म्हणतात. असा कार्टूनमध्ये राऊत आणि ठाकरेंमध्ये संवाद दाखवला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या