27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रसंभाजीराजे शिवबंधनात?

संभाजीराजे शिवबंधनात?

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संभाजीराजे छत्रपती हे उमेदवार असण्याची शक्यता आहे. संभाजीराजे छत्रपतींना सोमवार दि. २३ मे रोजी दुपारी १२ वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलावल्याची माहिती मिळाली आहे. याच वेळी संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यताही आहे.

सोमवारी दुपारी १२ वाजता संभाजीराजे छत्रपती यांनी अधिकृत पक्षप्रवेश करावे, त्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात येईल असा निरोप शिवसेनेच्या वतीने संभाजीराजेंना देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. शिवसनेचे नेते संजय राऊत यांनी संभाजीराजेंसोबत फोनवरून चर्चा केली आहे. पण संभाजीराजेंनी याला अद्याप मान्यता दिली नाही. त्यांनी एक दिवसाची वेळ मागितली आहे. पण संभाजीराजे शिवसेनेची ही ऑफर स्वीकारतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिवसेनेच्या कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा : पवार
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा हा शिवसेनेला असेल, मग शिवसेनेचे उमेदवार संभाजीराजे असो वा अन्य कुणीही असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, राष्ट्रवादीचा एक उमेदवार राज्यसभेसाठी निवडून येऊ शकतो.

उरलेली शिल्लक मते ही आम्ही शिवसेनेला देणार आहोत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत आम्ही शिवसेनेकडून राज्यसभेची दुसरी जागा मागितली होती. त्यावेळी शिवसेनेने आम्हाला सहकार्य केले. पुढच्या वेळी राष्ट्रवादीने आपल्याला सहकार्य करावे अशी मागणी त्यावेळी शिवसेनेने केली होती. त्यामुळेच यावेळी आम्ही शिवसेनेला मदत करण्याची भूमिका घेतली.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या