मेरठ : माकडांची एक टोळी मेडिकल कॉलेजच्या या परिसरात नेहमीच दिसते. इतके दिवस त्याकडे फारसं कुणी लक्ष दिलं नव्हतं. पण त्यातल्या माकडांनी आज सकाळी कहर केला.कोरोना-19 च्या रुग्णांच्या स्वॅबचे नमुने (कोरोना19 ) चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्यातली तीन सँपल्सच माकडांनी पळवली.
उत्तर प्रदेशात मेरठमध्ये हा प्रकार घडला. इंडिया टुडेने यासंदर्भात बातमी दिली आहे. या माकडांच्या हातात अजूनही कोव्हिड संशयित रुग्णांची सँपल्स असल्यामुळे आता ती माकडं जिथे जिथे नाचतील, तिथे विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरात भयंकर हाहाकार उडाला आहे. या घटनेचा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Read More लॉकडाऊनसंदर्भात गृहमंत्री अमित शाहांची सर्व मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन चर्चा
या भागात माकडांचा सुळसुळाट आहे आणि त्यांनी यापूर्वीही इथे हैदोस घातला असल्याचं मेरठ मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. या प्रकरणी कुणाच्या दुर्लक्षामुळे किंवा निष्काळजीपणामुळे माकडांच्या हाती ही सँपल्स लागली का याचा तपास हॉस्पिटलचे डीन आणि अधीक्षक करत आहेत.
In Meerut Monkeys run away with covid 19 samples #coronavirusinindia pic.twitter.com/NGLn35eCez
— Tarun Goyal (@omtechsoftwares) May 29, 2020