31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeउद्योगजगतचीनला डावलून सॅमसंगची भारतात गुंतवणूक

चीनला डावलून सॅमसंगची भारतात गुंतवणूक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून अनेक बड्या कंपन्या चीनमधून काढता पाय घेऊन भारतात गुंतवणूक करत आहेत. अशातच मल्टी नॅशनल कंपनी सॅमसंगनेही चीनला मोठा झटका दिला आहे. सॅमसंगने उत्तर प्रदेशातील नोएडा येथे आपले डिस्प्ले युनिट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत नोएडामध्ये सॅमसंगला ओएलईडी डिस्प्ले युनिट उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. हा प्रकल्प सुरू करताना भारत सरकारने सुरू केलेल्या स्कीम फॉर प्रमोशन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक कंपोनंट्स अँड सेमीकंडक्टर्स (एसपीईसीएस) अंतर्गत ४६० कोटी रूपयांची आर्थिक मदत मिळेल.

या प्रकल्पासाठी उत्तर प्रदेश सरकार इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग धोरणाअंतर्गत अनुदान आणि स्टँप ड्यूटीमध्ये कंपनीला सूट देणार आहे. चीनमधून सॅमसंग आपला हा व्यवसाय गुंडाळणार असून, तो भारतात सुरू केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी सॅमसंग भारतात ४ हजार ८२५ कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर १ हजार ५१० प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. तर मोठ्या प्रमाणात अप्रत्यक्ष रोजगारही सुरू होणार असल्याचे म्हटले जात आहे.

जगभरातील ७० टक्के सुटे भाग सॅमसंग बनविते
जगभरात टीव्ही, मोबाईल, टॅब, घड्याळे यांच्यात वापरले जाणारे ७० टक्के डिस्प्ले हे सॅमसंग तयार करते. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशातील संपूर्ण जगभरात हे डिस्प्ले निर्यात केले जातील. सद्यस्थितीतही सॅमसंग उत्तर प्रदेशातील सर्वात मोठा निर्यातदार आहे. गेल्या वर्षी सॅमसंगने २.७ अब्ज डॉलर्सची निर्यात केली होती. पुढील पाच वर्षांमध्ये कंपनीने ५० अब्ज डॉलर्सची निर्यात करण्याचे ध्येय ठेवले आहे. सॅमसंग डिस्प्ले युनिटला केस टू केस मदत करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन मंत्र्यांच्या समितीची स्थापना केली होती. कंपनीला विशेष मदतीसाठी या समितीने काही सूचनाही केल्या होत्या.

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड, जीन्स, टी-शर्ट, भडक कपडे, स्लीपर्स घालून कार्यालयात न येण्याची ताकीद !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या