शोएब लॉकडाऊनमध्ये; इझानला येते बाबांची आठवण
हैदराबाद : जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी बहुतांश देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र अनेक दिग्गज खेळाडूंचा धीर आता थोडासा का होईना सुटू लागलेला आहे. भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा लहान मुलगा इझान सध्या भारतात आहेत, तर सानियाचा पती शोएब मलिक पाकिस्तानात अडकला आहे. काही महिन्यांपूर्वी टेनिस कोर्टवर पुनरागमन केलेल्या सानिया मिर्झाने चांगली कामगिरी केली. मध्यंतरीच्या काळात स्पर्धेसाठी सानिया अमेरिकेत तर शोएब मलिक पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत खेळत होता. मात्र यानंतर लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे सानिया आणि शोएब आपापल्या देशांमध्ये अडकले आहेत.
Read More ‘फेड कप हार्ट’ सानिया
शोएबची आई ६५ वर्षांची आहे, तिची काळजी घेणंही या काळात गरजेचं आहे. सध्याच्या काळात आपण सर्वजण तंदुरुस्त राहू आणि लॉकडाऊन संपल्यानंतर एकमेकांना पुन्हा भेटू हीच इच्छा सध्या माझ्या मनात आहे.’’ सानिया एका वृत्तवाहिनीशी फेसबुक लाईव्हमध्ये बोलत होती. सध्याच्या खडतर काळात टेनिस किंवा सरावाचा विचार आपल्या मनात येत नसल्याचेही सानियाने स्पष्ट केले. बाहेर परिस्थिती गंभीर आहे, अशा परिस्थितीत माझ्या लहान मुलाची सुरक्षा कशी केली जाईल हाच विचार पहिले मनात येतो. घरात आई-बाबा असल्यामुळे त्यांचीही या कामात मदत होते. काही महिन्यांपूर्वी पुनरागमन केलेल्या सानियाने होबार्ट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दुहेरीचं विजेतेपद पटकावलं होतं. याचसोबत काही दिवसांपूर्वीच सानियाला टेनिस क्षेत्रातील फेड कप हार्ट या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
‘बाबांना पुन्हा कधी पाहू शकेल मला माहिती नाही’
शोएब पाकिस्तानात अडकलाय, मी भारतामध्ये. अशा परिस्थितीचा सामना करणं खरंच कठीण असतं, कारण आम्हाला लहान मुलगा आहे. इझान आपल्या बाबांना पुन्हा कधी पाहू शकेल मला माहिती नाही. आम्ही दोघेही खूप सकारात्मक आहोत, आजूबाजूच्या परिस्थितीची आम्हाला जाण आहे असे सानिया बोलत होती़