धामणगावातील युवकाने साकारली सॅनिटायझिंग मशिन

  469

  शिरूर अनंतपाळ :- स्वच्छ व सुंदर गाव म्हणून राज्यात सर्वत्र ओळख निर्माण केलेल्या धामणगाव येथील राजपाल गुडले नावाच्या युवकाने सेल्फ सॅनिटायझिंग मशिन बनवली आहे.आम्ही धामणगावकर तंत्रज्ञानातही मागे नाही हेच त्याने दाखवून दिले आहे.

  उपलब्ध साहित्यातून व कमीतकमी खर्चात या मशिनची निर्मिती राजपालने केली आहे.ग्रामीण भागातही टॅलेन्ट लपलेले असून त्याला योग्य ती दिशा व संधी मिळाली तर असे अनेक अविष्कार निर्माण होतील असे राजपालने सांगितले.
  असे हे उपयुक्त यंत्र बनविल्याबद्दल सरपंच धनराज पाटील,ज्ञानोबा बोळंगे,रमाकांत पाटील,व्यंकट गुडले,सुनिल जाधव,बळवंत माळी,सुनिल कोरे व ग्रामस्थांनी आनंदोस्तव साजरा केला.

  Read More  कोरोना उपचारांसाठी मुंबईत जम्बो सुविधांची निर्मिती

  कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाउन नंतर दीर्घ कालावधीने आज विविध कंपन्या,कार्यालये चालू झाली असून त्यांना आपल्या कर्मचारी व कामगारांची सुरक्षा घेण्यासाठी सुद्धा या मशिनचा चांगलाच फायदा होणार आहे.

  ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणादायी.
  उपलब्ध साधन सामुग्रीच्या आधारे आपल्या बुद्धी बळावर अगदी कमी खर्चातून कोणाचेही मार्गदर्शन न घेता प्रयोगशिल युवक राजपाल गुडले याने उपयुक्त यंत्र बनवून ग्रामीण भागात सॅनिटायझिंग मशीन उपलब्ध करून देत नव्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत गावातील युवक ही मागे नसल्याचे दाखवून दिले आहे. प्रयोगशिलतेतून उपयोगिता सिद्ध होत असून राजपाल गुडले याचे कार्य ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.