26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रसंजय राऊत भ्रष्टाचार करू शकत नाहीत

संजय राऊत भ्रष्टाचार करू शकत नाहीत

एकमत ऑनलाईन

मुंबई : पत्राचाळ प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कोर्टाने आज परत ४ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. संजय राऊत भ्रष्टाचार करू शकत नाहीत ते बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक असून आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. आता जरी संजय राऊतांना कोठडी सुनावली असली तरी ते सोमवारी जामीन होऊन बाहेर येतील असा विश्वास सुनील राऊतांनी व्यक्त केला आहे. तसेच स्वप्ना पाटकर आमच्यावर खोटे आरोप करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ज्या वेळी आम्ही अलिबागची जमीन घेतली होती त्यावेळी त्या जमिनीची किंमत होती ५० लाख रूपये आणि आता त्या जमिनीची किंमत एका कोटींच्या पुढे गेली होती, कारण त्या व्यवहाराला दहा वर्षे उलटून गेली आहेत. त्यामुळे ईडी करत असलेले आरोप हे खोटे आहेत. यामध्ये कोणताच भ्रष्टाचार झाला नाही. संजय राऊत बाळासाहेबांचा निष्ठावंत सैनिक आहे. तो कोणताच भ्रष्टाचार करू शकत नाही. असे सुनील राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, स्वप्ना पाटकरने फोनवरून धमकी दिल्याचा आरोप केला होता तर ज्या फोनवर फोन आला होता तो फोन आम्ही जमा करायला सांगितला होता पण तो फोन जमा का करण्यात आला नाही असा सवाल त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांची राजकीय ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सुनील राऊत यांनी केला आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या