27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रशिवसेनेकडून संजय राऊत सलग चौथ्यांदा राज्यसभेवर जाणार

शिवसेनेकडून संजय राऊत सलग चौथ्यांदा राज्यसभेवर जाणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जूनला निवडणूक होणार आहे. शिवसेनेच्या दुस-या उमदेवाराचे नाव अद्याप जाहीर नसले तरी पहिला उमेदवार म्हणून संजय राऊत यांचे नाव निश्चित आहे. २६ तारखेला ते आपला उमेदवारी अर्ज भरतील. त्यांच्या सलग चौथ्यांदा राज्यसभेवर जाण्याने एक नवा विक्रमही नोंदविला जाणार आहे.

शिवसेनेची ही तोफ महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून रोज धडाडत असतेच. पण याच तोफेवर विश्वास ठेवत शिवसेना ती पुन्हा राज्यसभेतही पाठविणार आहे. खासदार संजय राऊत हे शिवसेनेकडून राज्यसभेसाठी पुन्हा उमेदवार असणार आहेत. २६ मे रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. निवडणूक जिंकल्यानंतर सलग चौथ्यांदा शिवसेनेकडून राज्यसभेवर जाण्याचा विक्रमही राऊत प्रस्थापित करतील.

विधान परिषदेसाठी भाजपकडून प्रवीण दरेकर यांचे नाव निश्चित
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सध्या सर्वच पक्षाची धावपळ सुरू आहे. असे असताना आता भाजपमध्ये विधानपरिषदेसाठी देखील इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपमध्ये तर आतापासूनच इच्छुकांनी लॉबिंग करायला सुरुवात केली असून, याची यादी बरीच मोठी आहे. विधान परिषदेवर भाजपचे चार जण सहज निवडून जाणार असल्याने या चार जागासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहेत. प्रवीण दरेकर यांचे नाव जवळपास निश्चित झालेले आहे अशी सूत्रांची माहिती आहे.

भाजपकडून कुणाला संधी मिळणार?
विधान परिषदेवर जाण्यासाठी भाजपमध्ये ब-याच जणांची लॉबिंग सुरू असून, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना पुन्हा संधी मिळू शकते. तर प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांच्यापैकी कुणाला तरी एकाला पुन्हा विधान परिषदेची संधी मिळू शकते.एकीकडे प्रवीण दरेकर यांचे नाव जवळपास निश्चित झालेले असताना माजी मंत्री पंकजा मुंडे, चित्रा वाघ, अनिल बोंडे, राम शिंदे, कृपा शंकर सिंग यांचीही नावे चर्चेत आहेत. भाजपच्या वरिष्ठांकडून चार जागेसाठी कुणाला संधी मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या