22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रसंजय राऊतांना दिलासा नाहीच; जेलमधील मुक्काम वाढला

संजय राऊतांना दिलासा नाहीच; जेलमधील मुक्काम वाढला

एकमत ऑनलाईन

मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड कारागृहामध्ये मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये पुन्हा एकदा १४ दिवसांची वाढ केली आहे. ०५ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे राऊतांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे.

गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राऊत यांचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहामध्ये हलवण्यात आला. आज राऊत यांना पुन्हा एकदा पीएमएलए न्यायालयात हजर केले होते. संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत ०४ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

नियमित आणि जामीन अर्ज सुनावणी एकाच वेळी घ्यावी अशी विनंती राऊत यांच्या वकिलांनी केली होती. पण कोर्टाने न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. त्यामुळे राऊत यांना सप्टेंबर महिना जेलमध्ये मुक्कामी राहावे लागणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या