मुंबई : शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. अनेक नेते या बंडाविषयी भाष्य करत आहेत. अशाच एका बंडाद्वारे शिवसेनेतून बाहेर पडलेले आणि आता भाजपात असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही या बंडाविषयी भाष्य केले आहे. त्यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.
शिवसेनेच्या आजच्या परिस्थितीला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जबाबदार आहेत. शिवसेनेचे अस्तित्व आता संपले असून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा उभी राहणार नाही, असे नारायण राणे म्हणाले. राणे पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची मानसिक स्थिती ढासळली आहे. त्यामुळे आता त्यांनी तोंड बंद करावे, ज्यांना मुख्यमंत्री असतानाही स्वत:चे आमदार सांभाळता आले नाहीत, ते मतदार काय सांभाळणार? मविआमध्ये काम करताना
मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी जनतेचे कोणते प्रश्न सोडवले?
स्वत:च्या आमदार-खासदारांना आठ-आठ तास भेटण्यासाठी प्रतीक्षा करायला लावायची आणि त्यांची कामं करायची नाहीत. केवळ ‘मातोश्री’च्या आप्तांचीच कामं करायची हा एककलमी भ्रष्टाचार त्यांनी केला, असा आरोपही नारायण राणेंनी केला आहे.
तसेच आजच्या शिवसेनेच्या परिस्थितीला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जबाबदार आहेत. त्यामुळे आता शिवसेनेचे अस्तित्व संपले असून ते पुन्हा उभे राहणार नाही. याला संजय राऊत जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी आता गप्प बसून आराम करावा, असा टोलाही नारायण राणेंनी लगावला आहे.