24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रसंजय राऊतांना ईडीकडून तूर्तास दिलासा

संजय राऊतांना ईडीकडून तूर्तास दिलासा

एकमत ऑनलाईन

मुंबई : नवी दिल्ली येथे संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने शिवसेना खासदार संजय राऊत ईडीसमोर हजर झाले नाहीत, त्यामुळे त्यांच्या वकिलांनी ईडीकडे सूट मागितली. आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले होते. कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊतांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते.

पण संसदेच्या कामामुळे उपस्थित राहता येत नसल्यामुळे पुढील तारीख राऊतांनी मागितली होती. ईडीने राऊतांना पुढील तारीख दिली आहे.
संजय राऊत यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांना सात ऑगस्टपर्यंत सूट मागितली आहे, जी ईडीने मान्य केली आहे. संजय राऊत सात ऑगस्टनंतर ईडीसमोर हजर राहणार आहेत, अशी माहिती संजय राऊत यांचे वकील विक्रांत सापने यांनी दिली.

दरम्यान, यापूर्वी ईडीने संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली होती. कथित पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांची ९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

तसेच, काही दिवसांपूर्वी ईडीकडून संजय राऊतांची चौकशी करण्यात आली होती. संजय राऊत यांची १ जुलै रोजी ईडीने तब्बल १० तास चौकशी केली होती. ईडी ही केंद्राची तपासयंत्रणा असून आपण ईडीला पूर्ण सहकार्य केले. त्यांच्या मनात काही शंका असतील तर आमच्यासारख्या लोकांनी त्या दूर केल्या पाहिजेत, असा खोचक टोला देखील संजय राऊत यांनी लगावला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या