27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमहाराष्ट्रसंजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल होणार?

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल होणार?

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीकडून कारवाई सुरू आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून ईडीचे पथक संजय राऊतांच्या भांडुपमधील ‘मैत्री’ बंगल्यात ठाण मांडून आहे. तर, दुसरीकडे मुंबई पोलिसांकडूनही राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. स्वप्ना पाटकर यांनी धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांकडून एफआयआर नोंदवण्यात येणार असल्याचे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जिवे मारण्याची धमकी मिळत असल्याची तक्रार स्वप्ना पाटकर यांनी वाकोला पोलिस ठाण्यात दाखल केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना धमकी आणि शिवीगाळ होत असलेली एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यातील आवाज हा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा असल्याची चर्चा होती.

या प्रकरणात पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, स्वप्ना पाटकर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वाकोला पोलिस ठाण्यात धाव घेत स्वप्ना पाटकर यांना संरक्षण देण्याची मागणी केली होती.

पोलिसांनी ऑडिओ क्लिप प्रकरणात तपास सुरू केल्यानंतर आज भाजपच्या माजी खासदारांनी वाकोला पोलिस ठाण्यात पुन्हा धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. स्वप्ना पाटकर यांना फोनवरून देण्यात आलेली धमकी, पत्राद्वारे देण्यात आलेली धमकी, आदींबाबत संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली.

आज संध्याकाळपर्यंत वाकोला पोलिस स्वप्ना पाटकर धमकी प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली. स्वप्ना पाटकर यांना सुरक्षा पुरवण्यात येणार असल्याची माहिती सोमय्यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या