28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रसंजय राऊतांच्या अडचणीत वाढ

संजय राऊतांच्या अडचणीत वाढ

एकमत ऑनलाईन

  बिल्डरच्या मालकीच्या दोन गाड्या वापरत असल्याची माहिती ईडीकडे
मुंबई : पत्राचाळ प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राऊत आणि त्यांचे कुटुंबीय मुंबई पूर्व उपनगरातील एका बिल्डरच्या मालकीच्या दोन गाड्यांचा वापर करत असल्याची माहिती ईडीच्या तपासात समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांच्या मतदारसंघात श्रद्धा डेव्हलपर्सचे अनेक प्रकल्प आहेत. संजय राऊत आणि त्यांचे कुटुंबीय श्रद्धा डेव्हलपर्सच्या संचालकांच्या मालकीच्या दोन लक्झरी गाड्यांचा वापर करत होते. या प्रकरणाचा तपास करताना मुंबईसह अनेक ठिकाणी ईडीने छापेमारी केली. यावेळी पूर्व उपनगरातील रिअल इस्टेट डेव्हलपरच्या कार्यालयांवरही छापेमारी करण्यात आली.

मुलुंडमधील श्रद्धा डेव्हलपर्सच्या कार्यालयातील कागदपत्रं आणि संगणकांची ईडीच्या पथकाने तपासणी केली. सुनील राऊत यांच्या मतदारसंघातील भांडूप, मुलुंड आणि विक्रोळीत श्रद्धा डेव्हलपर्सचे अनेक प्रकल्प सुरु आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या पथकाने बुधवारी अवनी इन्फ्रास्ट्रक्चरवरही छापेमारी केली. ही कंपनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि पत्रा चाळ प्रकरणातील मुख्य आरोपी प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांनी सुरु केली होती.

संजय राऊत यांना १ ऑगस्टला अटक केल्यानंतर ईडीने संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून आर्थर रोड जेलमध्ये आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या