मुंबई : संजय राऊतांचा आवाज बंद करण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम भाजपच्या मदतीने ईडी करत असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी केले. संजय राऊत यांना अडकवायचे.
आमच्या कुटुंबाला त्रास द्यायचा. शिवसेनेचा आवाज बंद करायचा म्हणून हे सगळे कारस्थान सुरू असल्याचे राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी एक टक्क्याचाही भ्रष्टाचार केला नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे ते निष्ठावान कट्टर शिवसैनिक आहेत. ते कधीही भ्रष्टाचार करणार नाहीत. कारण बाळासाहेबांनी आम्हाला चांगली शिकवण दिली असल्याचे सुनील राऊत यांनी सांगितले.