23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंचा व्हिडिओ संदर्भात संजय शिरसाट यांचा यूटर्न

उद्धव ठाकरेंचा व्हिडिओ संदर्भात संजय शिरसाट यांचा यूटर्न

एकमत ऑनलाईन

 टेक्निकल प्रॉब्लेम असल्याचे दाखविले कारण; कॅबिनेट मंत्रीपदाच्या मागणीवर ठाम

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार संजय शिरसाट यांच्या उद्धव ठाकरेंविषयी केलेल्या ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. संजय शिरसाट यांनी त्यांच्या ट्विटरवर उद्धव ठाकरेंचा व्हिडिओ पोस्ट केला होता. तर, ट्विटरच्या डीपीमध्येही संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो लावला होता.

मात्र, माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो हटवून एकनाथ शिंदे यांच्या सोबतचा फोटो डीपीवर ठेवला. तर, याशिवाय पुन्हा ते ट्विट देखील डिलीट केले आहे. आज सकाळी पत्रकार परिषद घेत संजय शिरसाट यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

माध्यमांमधील लोकांचा फोन आल्यानंतर काहीतरी ट्विट झाल्याचे संजय शिरसाट म्हणाले. मी भावनेच्या भरात उद्धव ठाकरेंना कुटुंबप्रमुख म्हणालो. परंतु, तो माझ्या मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेम होता, मागची पोस्ट कशी फॉरवर्ड झाली हे सांगता येणार नाही. एक गोष्ट निश्चित आहे, की आम्ही सर्वजण उद्धव ठाकरेंना तुम्ही पक्षप्रमुख राहा आणि सत्ता दुस-याच्या हातात द्या, असे म्हणालो होतो.

माझ्या मोबाईलवरुन झालेली चूक म्हणा किंवा तांत्रिक अडचण होती. मी त्या गोष्टीचं समर्थन करणार नाही, मी एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे, त्यांच्या सोबतच राहणार आहे, असे शिरसाट म्हणाले.

कॅबिनेट आणि पालकमंत्रिपदावर ठाम
संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे कॅबिनेट आणि पालकमंत्रिपद मागितल्याचे सांगितले. आमचा ५० लोकांचा गट आहे, प्रत्येकाला काहीतरी मिळावे, असे वाटते. महामंडळ आणि मंत्रिपदाची अपेक्षा असणं गैर नाही, असंही संजय शिरसाट म्हणाले.

नेमके काय घडले ट्विटमध्ये
संजय शिरसाट यांनी एक ट्वीट केले होतेज्यात ‘उद्धव ठाकरे’ यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख केला होता. ट्विट सोबतचे विधानसभेतले उद्धव ठाकरेंचे एक भाषण देखील त्यांनी जोडले होते. मात्र, काही वेळातचं त्यांनी हे ट्वीट डिलीट देखील केले. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचे भाषण ट्वीट करत शिंदे गटाला इशारा तर दिला नाही ना अशी आता चर्चा सुरु झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या