बंळुरू : बंळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या सर्फराज खाननं मध्य प्रदेशविरुद्ध शतक झळकावलं आहे. या सामन्यातील दुस-या दिवसाच्या सुरुवातीलाच मुंबईच्या संघाला शम्स मुलानी आणि तनुष कोटियन रुपात दोन मोठे झटके बसले. मात्र, सर्फराजनं एका बाजूनं संघाची बाजू संभाळून ठेवली.
सध्या मुंबईच्या संघानं आठ विकेट्स गमावले असून मुंबईची धावा संख्या ३५० पार गेली आहे. सर्फराज अजूनही क्रिजवर
उपस्थित आहे.
सर्फराज खानची रणजी ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी
सर्फराज खानने रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामात चांगली कामगिरी केली आहे. मध्य प्रदेशविरुद्ध अंतिम सामन्यात मुंबईच्या संघाला धावांची आवश्यकता असताना सर्फराजनं शतक ठोकलंय. विशेष म्हणजे, सर्फराजनं रणजी ट्रॉफीतील मागील१२ सामन्यात सात शतक आणि पाच अर्धशतक झळकावलं आहे. या हंगामात त्यानं आतापर्यंत ८०० हून अधिक धावा केल्या आहेत.
अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे. यासह त्यानं भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणला मागं टाकलंय.
मुंबईच्या डावातील दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या संघानं लंच ब्रेकपूर्वी ३५१ धावांवर आठ विकेट्स गमावले होते. सर्फराज खान ११९ धावा) आणि तुषार देशपांडे (६ धावा) सध्या क्रिजवर आहे.