Sunday, September 24, 2023

सरकारकडून आणखी 47 चिनी ॲप्सवर बंदी

नवी दिल्ली : चीनवर भारत सरकारने पुन्हा एकदा कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. भारत सरकारने आणखी 47 चीनी ॲप्सवर बंदी घातली आहे. याआधी भारताने चीनचे 59 ॲप्स बॅन केले होते. या ॲप्सवर यूजर्सचा डेटा लीक करण्याचा आरोप लावण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. परंतु, अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. भारत आणि चीनी सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झडपीनंतर भारताने चीनवर डिजिटल स्ट्राईक करत त्यांच्या 59 ॲप्सवर बंदी घातली होती.

टिकटॉकसह 59 चिनी ॲप्स भारत सरकारने आधीच बॅन केले आहेत. आता सरकारची नजर 275 चिनी ॲप्सवर आहे. ज्यामध्ये PUBG चाही समावेश आहे. आता सरकारने आणखी 47 ॲप्सवर बंदी घातल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. परंतु, गृह मंत्रालयाकडून यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित एका अधिकृत सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, चिनी ॲप्ससंदर्भात माहिती गोळा केली जात असून त्यासंदर्भात चौकशी सुरु आहे. तसेच यासर्व ॲप्सना फंडिंग कुठून मिळतं, यासंदर्भातही माहिती गोळा करण्यात येत आहे. यापैकी काही ॲप्समुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत असल्याचं समोर आलं आहे, तर काही ॲप्स डाटा शेअरिंगच्या नियमांचं उल्लंघन करत असल्याचंही समोर आलं आहे.

चिनी ॲप्सचा आता सुपडासाफ झाला आता स्वदेशी ॲप्सची मोठ्या प्रमाणात क्रेझ

करोना विषाणूचा फैलाव झाला आणि त्यानंतर भारतासह जगभरातून सुरू होत असलेल्या ‘बॉयकॉट चायना’ चळवळीने आता वेग घेतला आहे. भारतात ही मोहीम जोरात चालू आहे. चिनी ॲप्सचा जवळपास आता सुपडासाफ झाला असून काही स्वदेशी ॲप्सची लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. आज जाणून घेऊयात या स्वदेशी ॲप्सविषयी ज्यांची मार्केटमध्ये हवा आहे.

१) TikTok हे चीनी कंपनीचे ॲप असल्याने त्याला जोरदार विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर नव्याने आलेले मेड इन इंडिया अॅप ‘चिंगारी’ हे TikTokला टक्कर देत आहे. हे ‘चिंगारी’ अॅप आजवर २५ लाखांहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. रोपोसो आणि चिंगारी या दोन्ही अ‍ॅप्सना कोट्यवधी भारतीयांची पसंती मिळू लागली आहे. या दोन्ही अ‍ॅप्समध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार फिल्टर्स आणि साऊंड वापरून शॉर्ट व्हिडीओ बनवून ते सोशल मीडियावर शेअर करू शकता.

२) ‘नमस्ते भारत’ हे वी चॅट आणि व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर देण्यासाठी नेक्स्टजेन डाटासेंटर या भारतीय कंपनीने विकसित केलं आहे. यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपसारखाच युजर इंटरफेस अनुभवता येईल. सध्या तरी हे अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप इतकं जलद नाही. पण, एक भारतीय चॅट अ‍ॅप म्हणून तुम्ही हे डाऊनलोड करून याचा अनुभव घेऊ शकता. या अ‍ॅपचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्टससोबत रिअल टाइम लोकेशन स्टेटसद्वारे शेअर करू शकता.

३) सुप्रसिद्ध जिओ आणि इनस्क्रिप्ट्स या दोन भारतीय कंपन्यांनीसुद्धा अनुक्रमे जिओमीट आणि से नमस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हे वेबिनार अ‍ॅप लाँच केले आहेत. से नमस्तेमध्ये ५० तर जिओ मीटमध्ये १०० पर्यंत सहभागी एका वेळी मीटिंग करू शकतात. स्क्रीन शेअरिंगचा पर्याय दोन्ही अ‍ॅप्समध्ये उपलब्ध आहे.

४) शेअर इट आणि झेंडर हे दोन्ही चीनी अ‍ॅप्स आहेत. त्यामुळे भारतीयांनी ती अनइन्स्टॉल करायला सुरुवात केली आहेत. यांना उत्तम पर्याय म्हणून क्वांटमफॉरयू या भारतीय कंपनीनं ‘शेअर ऑल’ हे अ‍ॅप उपलब्ध करून दिलं आहे.

Read More  1 सप्टेंबरला सुनावणी : मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलली

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या