22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदे गटात जाऊनही पुन्हा सरनाईक ईडीच्या रडारवर?

शिंदे गटात जाऊनही पुन्हा सरनाईक ईडीच्या रडारवर?

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने कारवाई केल्याने ते अडचणीत आले होते. शिवसेनेतल्या बंडानंतर त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. यावेळी ईडीची कारवाई टाळण्यासाठी आपण पाठिंबा देत आहोत, असे संकेतही सरनाईकांनी दिले होते. मात्र आता पुन्हा त्यांच्यावर ईडीचे सावट आहे.

शिंदे गटात जाऊनही पुन्हा प्रताप सरनाईक ईडीच्या रडारवर आले आहेत. सरनाईकांची ११ कोटींची संपत्ती ईडीकडून ताब्यात घेतली जाणार असल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. सरनाईकांचे ठाण्यात दोन फ्लॅट आहेत, तर मीरा रोडवर एक प्लॉट आहे. ही मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात येणार आहे.

एनएसईएल घोटाळ्याच्या संदर्भात आता ईडी कारवाई करण्याची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने प्रताप सरनाईकांच्या संपत्तीचा ताबा घेण्यात येणार आहे. दरम्यान, हीच कारवाई टाळण्यासाठी प्रताप सरनाईक यांनी बंडावेळी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला होता. मात्र तरीही त्यांना दिलासा मिळालेला नाही, हे यावरून स्पष्ट होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या