18.6 C
Latur
Thursday, February 2, 2023
Homeराष्ट्रीयसरपंचाचे लोणचे पडले महागात : 100 नागरिकांना क्वारंटाईन

सरपंचाचे लोणचे पडले महागात : 100 नागरिकांना क्वारंटाईन

एकमत ऑनलाईन

सरंपचाने 12 लोकांना मिळून लोणचे तयार केले : काही  दिवसांपुर्वी 4 हजार लोकांना लोणचे वाटले होते

तेलंगाना : तेलंगानाच्या महबूबनगरमधील नवाबपेट मंडल येथील गावातील 100 नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. गावातील सरपंचाने काही दिवसांपुर्वी 4 हजार लोकांना लोणचे वाटले होते. आता हे लोणचे बनवणाऱ्या व्यापारी आणि आचाऱ्याला कोरोना झाल्याचे समोर आल्यानंतर गावकऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. गावकऱ्यांना संसर्गाच्या भितीने लोणचे देखील फेकून दिले आहे.

तेंलगानामध्ये उन्हाळ्यात आवडीने लोणचे खाल्ले जाते. मात्र आता गावकऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. जिल्हा मेडिकल आणि आरोग्य अधिकारी (डीएमएचओ) डॉ. के कृष्णा यांनी सांगितले की आतापर्यंत एकाही नागरिकाला संसर्ग झाल्याचे समोर आलेले नाही. काही गावकरी लोणचे खाल्ल्याने घाबरलेले आहेत. मात्र आम्ही त्यांना समजवत आहोत की लोणचे खाल्ल्याने संसर्ग होत नाही.

Read More  कोरोनामुळे पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू रियाझ शेख यiचा मृत्यू

अधिकाऱ्यांनुसार, सरपंच आणि त्यांच्या पतीने गावातील सर्वांना लोणचे वाटप करण्याची योजना बनवली होती. यासाठी ते कोल्लूरपासून 50 किमी लांब शादपूर येथील एका लोणचे बनवणाऱ्या ट्रेडरला भेटण्यास गेले. ट्रेडरने दोन आचाऱ्यांची सोय केले. सरंपचाने 12 लोकांना मिळून लोणचे तयार केले. काहीजणांनी त्याच दिवशी लोणचे खाल्ले तर काहीजण घरी घेऊन गेले. मात्र ट्रेडर आणि एक आचारी कोरोनाग्रस्त असल्याचे आढळल्याने गावकरी घाबरले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या