19.8 C
Latur
Monday, December 5, 2022
Homeराष्ट्रीयसोरेन यांच्यामागे ईडीचा ससेमिरा

सोरेन यांच्यामागे ईडीचा ससेमिरा

एकमत ऑनलाईन

रांची : झारखंड उच्च न्यायालयाने हेमंत सोरेन यांच्या कुटुंबीयांसह त्यांच्या जवळच्या लोकांची ईडीव्दारे चौकशी करण्याचे निर्देश दिले. खरे तर सोरेन कुटुंबाच्या मालमत्तेच्या चौकशीसंदर्भात झारखंड उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली.

या संपूर्ण प्रकरणात हेमंत सोरेन, बसंत सोरेन, रवी केजरीवाल आणि अमित अग्रवाल यांच्यासहर् २ जणांच्या संपत्तीची चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने सुनावणीदरम्यान दिले. कंपनीचे रजिस्ट्रार आणि ईडी या प्रकरणाची चौकशी करणार आहे. कंपनीचे रजिस्ट्रार या प्रकरणात सहभागी असलेल्या ३०० हून अधिक कंपन्यांची क्रेडेन्शियल तपासणी करतील.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या