23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रसाता-यात मॅरेथॉनला गालबोट¹; एका धावपटूचा मृत्यू

साता-यात मॅरेथॉनला गालबोट¹; एका धावपटूचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

सातारा : साता-यामध्ये आज हाफ हिल मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. यामध्ये धावताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली आहे. कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरात राहणा-या राज क्रांतीलाल पटेल (वय ३२) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोवर त्याचा मृत्यू झाला होता.

सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धा आज पार पडली. या स्पर्धेत कोल्हापूरचे राज पटेल हे देखील सहभागी झाले होते. या स्पर्धेत धावत असताना पटेल अचानक कोसळले. दहा मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केले असून तपासणीनंतर मृत्यूचे नेमके कारण कळेल, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

दरवर्षी याच काळात आयोजित करण्यात येणारी ही हिल मॅरेथॉन प्रसिद्ध आहे. यासाठी देशभरातून तसेच परदेशातूनही हौशी धावपटू येत असतात. दरवर्षी शिस्तबद्ध पद्धतीने ही मॅरेथॉन पार पडते. मात्र यंदा या धावपटूच्या मृत्यूने या मॅरेथॉनला गालबोट लागल्याची भावना सहभागी धावपटूंकडून व्यक्त केली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या