18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeराष्ट्रीयसॅटेलाईट टीव्ही चॅनल नियंत्रणमुक्त होणार!

सॅटेलाईट टीव्ही चॅनल नियंत्रणमुक्त होणार!

एकमत ऑनलाईन

प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांची माहिती
नवी दिल्ली : आगामी एका महिन्यात सॅटेलाइट टीव्ही चॅनेल नियंत्रणमुक्त केले जातील, अशी माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी दिली. प्रक्षेपण नियमावलीच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सुधारणा करण्यात येणार असून त्याअंतर्गत टीव्ही चॅनल नियंत्रणुक्त करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. भारताला अपलिंकिंगचे प्रमुख केंद्र बनवण्याचा सरकारचा उद्देश आहे.

सॅटेलाइट टेलिकम्युनिकेशन्समध्ये अपलिंक ही ग्राउंड स्टेशनपासून उपग्रहापर्यंतची लिंक असते. दुसरीकडे डाउनलिंक म्हणजे उपग्रहाच्या खाली असलेल्या एक किंवा अधिक ग्राउंड स्टेशनमधील दुवा असतो,अपूर्व चंद्रा यांनी आज इंडिया स्पेस काँग्रेसला संबोधित केले, त्यावेळी ते बोलत होते. देशातील ८९८ दूरदर्शन प्रसारकांपैकी ५३२ चॅनल त्यांच्या सेवांच्या अपलिंकिंग आणि डाउनलिंकिंगसाठी परदेशी उपग्रहांचा वापर करतात. आम्ही उपग्रहांच्या अपलिंकिंगवर नियंत्रण ठेवू इच्छितो, जेणेकरून भारत या क्षेत्रात एक केंद्र म्हणून उदयास येईल. प्रेक्षपण नियमावलीची मार्गदर्शक तत्त्वे २०११ मध्ये जारी करण्यात आली होती. त्यामध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये लवकरच सुधारणा केली जाईल. हे काम आगामी एका महिन्यात पूर्ण होऊ शकते, असेही चंद्रा म्हणाले.

नेपाळ, श्रीलंका, भूतानसारखे शेजारी देशदेखील त्यांच्या टेलिव्हिजन चॅनलला अपलिंक करण्यासाठी भारताचा वापर करू शकतात, मे २०२० मध्ये केंद्र सरकारने डीडी फ्री डिश स्लॉटसाठी काही चॅनलच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रक्षेपण नियमावलीसाठी मसुदा मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.

थेट मोबाईल प्रसारण?
प्रसार भारती आणि आयआयटी कानपूर मोबाईल सामग्रीपेक्षा टीव्ही सामग्रीचा वापर वाढवण्याच्या उद्देशाने थेट-टू-मोबाइल प्रसारण मंच विकसित करत आहेत. त्यामुळे मोबाइल वापरकर्ते थेट चॅनल पाहू शकतात. यामुळे स्पेक्ट्रमचा प्रभावी वापर वाढेल आणि ब्रॉडकास्टरच्या खर्चावर परिणाम होईल. त्यामुळे प्रेषकांची संख्यादेखील ८०० दशलक्षपर्यंत वाढेल, अशी माहिती चंद्रा यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या