38.1 C
Latur
Tuesday, June 6, 2023
Homeसमाधानकारक : लातूर जिल्ह्यात आज एकही रुग्ण नाही

समाधानकारक : लातूर जिल्ह्यात आज एकही रुग्ण नाही

एकमत ऑनलाईन

​लातुर 57 पैकी 54 निगेटीव्ह  03 Inconclusive

लातूर : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 01.06.2020 रोजी लातूर जिल्ह्यातील एकुण 57 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते.  त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 15 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  त्यापैकी 12 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून 03 व्यक्तीचे अहवाल Inconclusive आले आहेत.

तसेच  28 व्यक्तीं मोती नगर लातूर येथील पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या होत्या.  त्या सर्व 28 व्याक्तीच्या स्वॅबची तपासणी केली असता निकटवर्तीय व संपर्कात आलेल्या सर्वच व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत ही दिलासादायक बाब आहे.

Read More  राज्यातील रूग्णवाढीचा दर ११ दिवसांवरून १७ दिवसांवर

उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 13 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी सर्वच 13 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.  रेणापूर येथून एका व्यक्तीचा स्वॅब तपासणीसाठी आला होता त्या व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

असे लातूर जिल्ह्यातून एकूण 57 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 54 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 03 व्यक्तीचे अहवाल Inconclusive आले आहेत.अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या