22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeक्राइमसत्तूरनं केले 16 वार : महालक्ष्मी मंदिरासमोरच हत्येचा थरार!

सत्तूरनं केले 16 वार : महालक्ष्मी मंदिरासमोरच हत्येचा थरार!

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे मात्र तरीही गुन्ह्यांच्या घटना काही थांबत नसल्याचं दिसत आहे. कोरोनामुळे माणसं घराबाहेर पडायला घाबरत आहेत. पण याचं गांभीर्य गुन्हेगारांना मात्र काही दिसत नाही. कारण कोल्हापूरमध्ये एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कोल्हापुरातल्या कागल वस्तीमध्ये एका तरूणाची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या दिवसाढवळ्या केल्याने तेथील परिसरात भीतीच वातावरण परसलं आहे. आधीच कोरोनाने माणसं भीतीने घाबरली असताना अशा घटनेमुळे नागरिकांना खूप भीती वाटू लागली आहे.

तरूणावर कोयत्याने सपासप वार केले

कागलमधल्या महालक्ष्मी मंदिरसमोर दोन दुचाकीस्वार आले त्यांनी अक्षय विनायक सोनुले या तरूणावर कोयत्याने सपासप वार केले. वार करताना त्यांनी सत्तुराचा वापर केला असल्याची माहिती तेथील स्थानिक नागरिकांनी दिली आहे. मृत अक्षयवर दोन तरूणांनी एक दोन नाही तर सोळा वार केल्याने त्याच्या शरीरावर खोल जखमा झाल्या. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यु झाला, असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अक्षयचा खून हा वर्चस्ववादातून झाला असल्याची माहिती आहे.

आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणार

दरम्यान, अजूनही आरोपींची ओळख पटली नाही यासाठी पोलीस आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणार असून सोबत अक्षयवर वार होताना ज्यांनी पाहिलं त्यांची चौकशी करणार असल्याची माहिती आहे. अक्षयवर झालेल्या या हल्याने त्याच्या संपुर्ण कुटूंबावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे.

Read More  आरोग्य यंत्रणा ‘व्हेंटिलेटर’वर : शहरात एकही व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाही

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या