21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeतंत्रज्ञानसत्या नाडेला मायक्रोसॉफ्टचे नवे अध्यक्ष

सत्या नाडेला मायक्रोसॉफ्टचे नवे अध्यक्ष

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सध्या मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष जॉन थॉमसन आहेत. सत्या नाडेला त्यांची जागा घेतील. थॉमसन यांना २०१४ मध्ये अध्यक्ष बनविण्यात आले होते. त्या आधी ते कंपनीच्या संचालक मंडळावर प्रमुख स्वतंत्र संचालक होते. नाडेला २०१४ मध्ये मायक्रोसॉफ्टचे सीईओ झाले होते. मायक्रोसॉफ्ट कंपनी तेव्हा मोठ्या संकटातून जात होती.

मायक्रोसॉफ्टचे मार्केटमध्ये स्थान पक्के करण्यासाठी केलेले अनेक प्रयोग फसले होते. यामध्ये नोकिया-विंडोज ओएसचा प्रयोग सपशेल फसला होता. नाडेला यांनी या सगळ्यातून कंपनीला बाहेर काढले. शिवाय त्यांनी क्लाऊड कॉम्प्युटिंग, मोबाईल अ‍ॅप्लिकेशन आणि आर्टिफिशिअल इन्टेलिजन्सवर काम केले. पारंपरिक सॉफ्टवेअर निर्मितीमध्ये आमूलाग्र बदल केले.

त्यांच्या कार्यकाळात मायक्रोसॉफ्टच्या कंपनीच्या शेअर्समध्ये सातपटींनी वाढ झाली. कंपनीचे बाजारमूल्य दोन लाख कोटींवर जाऊन पोहोचले आहे. नाडेला कंपनीचे तिसरे सीईओ आणि तिसरे चेअरमन असणार आहेत. याआधी बिल गेट्स, थॉमसन या जागी होते. नाडेला या आधी स्टीव्ह बाल्मर कंपनीचे सीईओ राहिलेले आहेत. नाडेला यांनी हैदराबादमध्ये शिक्षण घेतले आहे.

ढग पिंपरी ते बार्शी 20 किमी फरफटत नेऊन अपघात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या