18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeजेलमध्ये मसाज करुन घेतात सत्येंद्र जैन ;ईडीकडून कोर्टात शपथपत्र

जेलमध्ये मसाज करुन घेतात सत्येंद्र जैन ;ईडीकडून कोर्टात शपथपत्र

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : बेहिशोबी मालमत्ता आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात १५४ दिवसांपासून तिहारच्या तुरुंगात सरकारी पाहुणचार घेत असलेले दिल्ली सरकारमधील आम आदमी पक्षााचे मंत्री सत्येंद्र जैन हे मालिश करून घेत आरामात जगत आहेत, असे शपथपत्र सक्त वसुली संचालनालयाने न्यायालयाला सादर केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

ईडीने न्यालायात सादर केलेल्या या सविस्तर शपथपत्रात अनेक बाबींवर बोट ठेवले आहे. इडीच्या म्हणण्या नुसार कारागृह अधीक्षक नियमाविरुद्ध जाऊन मंत्री जैन यांना जावयाचा पाहुणचार देत आहेत. हे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन आहे. जैन यांच्यासाठी दररोज घरातून जेवण मागवले जात आहे. त्यांची पत्नी पूनम जैन अनेकदा त्यांना भेटण्यासाठी सेलमध्ये येतात. हे चुकीचे आहे. जैन हे आरोपींसोबत सेलमध्ये तासनतास बैठका घेतात. सत्येंद्र जैन हे आपल्या मंत्री पदाचा गैरफायदा घेत आहेत. जेल प्रशासनाने मात्र हे आरोप फेटाळून लावले.

१५४ दिवसांपासून आहेत तिहार तुरुंगात
बेहिशोबी मालमत्ता आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने ३० मे रोजी सत्येंद्र जैन आणि त्यांची पत्नी पुनम यांच्यावर गुन्हा दाखल करीत जैन यांना अटक केली होती. ते गेल्या १५४ दिवसांपासून तिहार तुरुंगात आहेत. जैन यांनी ५४ शेल कंपन्यांच्या माध्यमातून कोलकाता येथील तीन हवाला ऑपरेटर्सकडून १६ कोटी ३९ लाख रुपयांचा काळा पैसा हस्तांतरित केला. गेल्या महिन्यात ईडीने जैन कुटुंब आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांची ४ कोटी ८१ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या