24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeआंतरराष्ट्रीय१८ महिन्यानंतर सौदी अरेबिया मास्क फ्री

१८ महिन्यानंतर सौदी अरेबिया मास्क फ्री

एकमत ऑनलाईन

रियाध : कोरोना महासाथ सुरू झाल्यानंतर जवळपास १८ महिन्यानंतर सौदी अरेबियातील जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. करोनाबाधितांच्या संख्येत घट आणि देशाातील सर्वाधिक लसीकरण दर यामुळे १७ ऑक्टोबरपासून कोरोना निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. करोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना निर्बंधातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास १८ महिन्यानंतर सौदी अरेबियातील नागरिक मोकळा श्वास घेणार आहेत.

सौदी अरेबियातील एकूण ३४.८ दशलक्ष लोकसंख्येपैकी २०.६ दशलक्ष नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. काही विशेष ठिकाणांना वगळता अन्य सार्वजनिक स्थळांवर मास्कचा वापर करणे अनिवार्य असणार नाही. यामध्ये मक्केतील ग्रँड मशीद आणि मदिना येथील प्रेषित पैगंबर यांच्या मशिदीचा समावेश आहे. या ठिकाणी येणा-या सर्वांना मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. दोन्ही मशिदी लोकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. मात्र, सरकारच्या अ‍ॅपद्वारेच पूर्व नोंदणी करून जाता येणार आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या