नवी दिल्ली : सौदी अरेबियाने जारी केलेल्या एका नकाशामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाखचा प्रदेश वगळल्याबद्दल भारताने कठोर शब्दामध्ये निषेध नोंदवला आहे. सौदी अरेबियाने योग्य बदल न केल्यास भारत पुढील महिन्यात होणाऱ्या जी २० परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याचा इशाराही दिला आहे.
हा वादग्रस्त आणि चुकीचा नकाशा जी २० देशांच्या परिषदेच्या निमित्त २० रियालच्या चलनी नोटेवर छापला आहे. मात्र हा नकाशा चुकीचा असल्याचे सांगत भारताने या चुकीच्या नकाशासंदर्भातील मुद्दा उपस्थित करत नाराजी व्यक्त केली आहे. सौदी अरेबियाने नकाशामध्ये बदल केला नाही तर भारत पुढील महिन्यात होणाऱ्या जी २० परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याचेही सांगण्यात येत आहे.
जी २० परिषदेच्या पार्श्वभूमीवर २० रियालची नवीन नोट जारी करण्यात आली आहे. नोटेवर एका बाजूला सौदीचे राजे सलमान आणि जी२० सौदी परिषदेचा लोगो छापला आहे. तर दुसºया बाजूला जागतिक नकाशा छापून त्यामध्ये जी २० मध्ये कोणते देश आहेत हे दर्शवले आहे. मात्र या नकाशामध्ये जम्मू-काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीर हे स्वतंत्र प्रदेश दाखवले आहेत. या नकाशामध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट आणि बाल्टिस्तानचा प्रदेशही दाखवलेला नाही.
भारताने यासंदर्भात दिल्लीतील सौदी अरेबियाच्या राजदुतांकडे तक्रार नोंदवली आहे. तर रियाधमधील भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयानेही सौदी अरेबियातील संबंधित अधिका-यांकडे यासंदर्भात आक्षेप नोंदवला असून ही चूक गंभीर स्वरुपाची असल्याचे म्हटले आहे.
देशभरात ९१ % रुग्णांनी कोरोनावर केलेली मात