23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Home‘त्यांना’ निरोप देताना

‘त्यांना’ निरोप देताना

एकमत ऑनलाईन

आला सास गेला सास
जीवा तुझरं तंतर,
अरे, जगणं-मरणं
एका सासाचं अंतर!

कवितेच्या या चार ओळीत कविश्रेष्ठ बहिणाबाई चौधरी यांनी जीवनाचे सारच मांडले आहे़ प्रत्येक श्वास माणसाला जीवंत असल्याची अनुभूती देत असतो़ आलेल्या संकटांनाही समोरे जात असताना त्याचाच प्रत्यय येत असतो़ कोरोना या महाभयंकर आजराने संपूर्ण जग हादरून गेले आहे़ अशा जागतिक संकटात फक्त मानवी जीव सापडला आहे विशेष़ या आजाराने माणसाला माणसापासून अलगीकरण केले आहे़ एकमेकांना मुक्तपणे भेटण्याची, तासन्तास आपलेपणाच्या गप्पा मारण्याची संधी हिरावून घेतली आहे त्यामुळेच आपलेपणाने वर्षानुवर्षे राहिलेले नागरिक आता दूरदूर जात आहेत़ त्यांना निरोप देताना अंत:करण जड होण्याच्या पलिकडची अवस्था होते; परंतु नाईलाज.

Read More  फक्त मास्क आणि सोशल डिस्टेंसिंग कोरोनाला रोखू शकते

कोरोना आजाराने हे सर्व घडवले आले़ परराज्यातील कामगारांच्या अडचणी लक्षात घेता त्यांना परिवहन महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून स्वगृही पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली़ या कामगारांनी आत्तापर्यंत लातूर शहरात, जिल्ह्यात राहून तसेच मजुरी करून लातूरच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वर्षानुवर्षे लातूरला घर मानून राहिलेले लोक आज इथून परत जात आहेत त्यामुळे त्यांना रवाना करण्यासाठी स्वत: उपस्थितीत असणे लातूर ग्रामिणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांना महत्त्वाचे वाटले. यामुळे त्यांना निरोप देताना एक भावनिक दडपण मनावर होते. या स्थलांतरितांनी आपल्यासाठी केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांना मदत करणे त्यांना अगत्याचे वाटले आणि त्यांनी ती केली़

मध्य प्रदेशमधील १७४ नागरिकांची लातूर येथून २ एस़ टी़ बसेस आणि रेणापूर येथून ५ बसेसद्वारे परराज्यातील नागरिकांना त्यांच्या स्वगृही रवानगी करण्यात आली. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परराज्यातील एकूण ३८६ कामगारांना आतापर्यंत लातूर, रेणापूर, औसा तालुक्यांतून १८ बसेसच्या माध्यमातून स्वगृही सुखरुप पाठविण्यात आले आहे. उर्वरित कामगारांनादेखील स्वगृही पाठविण्यासाठी लवकरच व्यवस्था केली जाईल. कामगारांना कुठलीही अडचण होणार नाही यासाठी आमदार धिरज विलासराव देशमुख हे स्वत: उपस्थित राहून लक्ष घालत आहेत़ लातूर व परिसरातील विद्यार्थी, मजूर तसेच स्थलांतरित लोकांना पुन्हा घरी जाण्यासाठी हे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. त्यांना लवकरच घरी परतता यावे यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. वाहतुकीत कोणताही खोळंबा येऊ नये यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. आपल्या सेवेसाठी नेहमीच कटिबद्ध असल्याचा एक दिलासा आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी दिला आहे़

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या