नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँकेच्या कर्मचा-यांनी पीएम केअर्स फंडासाठी आणखी ७.९५ कोटी रुपये देण्याचे ठरवले आहे. ही मदत करण्यासाठी या कर्मचा-यांनी आपले एक दिवसाचे वेतन आणि एक दिवसाच्या रजेचे पैसे या फंडासाठी देऊ केले आहेत. ही रक्कम एकूण १०७.५ कोटी रुपये होत आहे. ही माहिती बँकेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दिली आहे.
Read More देशभरातील स्मार्टफोन युझर्सला सर्बेरस व्हायरसचा धोका
याआधी एसबीआयच्या दोन लाख ५६ हजार कर्मचा-यांनी मार्चमध्ये १०० कोटी रुपये दिले होते. या निधीसाठी २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या नफ्यामधील ०.२५ टक्के इतकी रक्कम सीएसआर उपक्रमाचा भाग म्हणून देण्याचे आश्वासन स्टेट बँकेने यापूर्वी दिले आहे. सध्याच्या संकटकाळात एसबीआय आपल्या ग्राहकांना शक्य तितक्या चांगल्या बँकिंग सेवा देण्यासाठी प्रयत्न करत आहे.
सुरक्षित वावर कायम राखण्याच्या दृष्टीने नागरिकांनी घराबाहेर पडू नये व डिजिटल बँकिंग सेवांचा लाभ घ्यावा, याकरता बँकेकडून सतत आवाहन करण्यात येत आहे.