27.3 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeमहाराष्ट्रसुप्रिया सुळेंचे नाव वापरून महिला बचत गटात घोटाळा?

सुप्रिया सुळेंचे नाव वापरून महिला बचत गटात घोटाळा?

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात सध्या एक नवा कथित घोटळा गाजू लागल्या. हा नवा घोटाळा हा महिला बचत गटात झाला असल्याचा आरोप भाजप आमदार संजय कुटे यांच्याकडून करण्यात येत आहे. संजय कुटे यांनी यांनी या प्रकरणात फक्त घोटाळ्याचेच आरोप केले नाहीत. तर या घोटाळाल्यासाठी सुप्रिया सुळेंच्या नावाचा वापर झाल्याची शंकाही त्यांनी व्यक्त झालीय. तसेच राज्यातील सत्ताधारी पक्षातील नेत्यांची नावं वापरून असे घोटाळे होत असतील तर हे प्रकरण गंभीर आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी याची तात्काळ दखल घ्यावी, आणि या प्रकरणाची खोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. तसेच या प्रकरणात ज्या गोरगरिब महिलांची फसवणूक झाली आहे. त्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा अशी मागणी कुटे यांनी केली आहे.

महिला गृहउद्योगाच्या नावाखाली राज्यभरातील हजारो महिलांची कोट्यवधींची फसवणूक झाली असून या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष चौकशी पथकामार्फत चौकशी करावी व या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अजित हिवरे याला तातडीने अटक करावी , अशी मागणी संजय कुटे यांनी गुरुवारी केली. या मागणीचे निवेदन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आले असून फसवणूक झालेल्या महिलांना न्याय मिळाल्याखेरीज भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही , असा निर्धारही कुटे यांनी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यावेळी उपस्थित होते.
कशी झाली फसवणूक

कुटे म्हणाले की , अजित हिवरे यांनी राधाकृष्ण सेल्स कॉर्पोरेशन या कंपनीमार्फत महिलांना स्वयंरोजगार देण्याचा व्यवसाय सुरु केला. मसाले पॅकिंग मशीन , बटन तयार करणारी मशीन , आटा मशीन याची विक्री मल्टी लेव्हल मार्केटिंग पद्धतीने करण्यासाठी सुमारे २६ जिल्ह्यांत या कंपनीच्या शाखा उघडल्या. जिल्ह्याजिल्ह्यात महिला डेव्हलपमेंट ऑफिसर नेमून व्यवसाय सुरु केला. प्रत्येक मशीनची किंमत ११ ते १५६ हजार रु. दरम्यान ठेवण्यात आली. या मशीनद्वारे निर्माण केलेला माल कंपनीकडून खरेदी करण्याचे आश्वासनही देण्यात आले. सुरुवातीला २-३ महिने महिलांनी खरेदी केलेल्या मशीनच्या मार्फत तयार झालेल्या वस्तू कंपनीने खरेदीही केल्या.

फसवणूक करणारे फरार
त्यानंतर मात्र कंपनीकडून वस्तू खरेदी बंद झाली. आता तर कंपनीचे पुण्यातील कार्यालय बंद करण्यात आले असून कंपनीचा मालक हिवरे हा फरार झाला आहे. व्यवसाय वाढीसाठी अकोला , बुलडाणा जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांत सत्ताधारी राष्ट्रवादी नेत्यांच्या नावाचा वापर केला गेला असल्याचे उघड झाले आहे. हजारो महिलांनी ११ हजार रु . भरून मशीन खरेदी केल्या आहेत. आपली फसवणूक झाल्यावर अनेक ठिकाणी महिलांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यानुसार काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. फसवणूक झालेल्या महिलांनी आपल्या गावातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिक-यांशी , लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहनही कुटे यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या