17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeआंतरराष्ट्रीयशास्त्रज्ञांनी बनवला जगातला सर्वात पांढरा रंग

शास्त्रज्ञांनी बनवला जगातला सर्वात पांढरा रंग

एकमत ऑनलाईन

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या एका विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या चमूने जगातील सर्वात पांढरा रंग तयार केला आहे, जो ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धच्या लढ्याला मदत करू शकतो. आतापर्यंतचा सर्वाधिक पांढरा रंग म्हणून या रंगाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये प्रवेश केला आहे. पर्ड्यू विद्यापीठातील मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे प्राध्यापक झ्युलीन रुआन आणि त्यांच्या टीमने हा रंग विकसित केला आहे.

या रंगामुळे ९८.१ टक्के सूर्यप्रकाश परावर्तित होतो आणि इन्फ्रारेड उष्णता परावर्तित होते, ज्यामुळे इमारतींच्या सभोवतालच्या हवेचे तापमान थंड होऊ शकते. याचा अर्थ ते एअर कंडिशनरचा वापर कमी करू शकते. नवीन पेंट सूर्यापासून उत्सर्जित होणा-या उष्णतेपेक्षा कमी उष्णता शोषून घेतो. व्यावसायिक पांढरा रंग साधारणपणे केवळ ८० ते ९० टक्के सूर्यप्रकाश परावर्तित करतो. सामान्य व्यावसायिक पांढरा रंग थंड होण्याऐवजी उबदार होतो. उष्णता नाकारण्यासाठी तयार केलेले बाजारातील रंग केवळ ८० ते ९० टक्के सूर्यप्रकाश परावर्तित करतात आणि पृष्ठभागाला त्यांच्या सभोवतालपेक्षा थंड करू शकत नाहीत, पर्ड्यू विद्यापीठाने एका निवेदनात म्हटले आहे.

सुमारे एक हजार चौरस फूट छप्पर क्षेत्र झाकण्यासाठी हा रंग वापरल्याने १० किलोवॅटची शीतकरण शक्ती निर्माण होऊ शकते, असे पर्ड्यू विद्यापीठातल्या संशोधकांनी सांगितले. रुआन यांच्या मते, बहुतेक घरांमध्ये वापरल्या जाणा-या एअर कंडिशनर्सपेक्षा हे अधिक शक्तिशाली आहे. जेव्हा आम्ही सुमारे सात वर्षांपूर्वी हा प्रकल्प सुरू केला होता, तेव्हा आम्ही ऊर्जा वाचवत होतो आणि हवामान बदलाशी लढा देत होतो, असे रुआन हे द इज पर्ड्यूच्या पॉडकास्ट एपिसोडमध्ये म्हणाले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या