38.1 C
Latur
Tuesday, June 6, 2023
Homeवाहनचालकांच्या खिशाला कात्री, एक जूनपासून पेट्रोल डिझेल महागणार

वाहनचालकांच्या खिशाला कात्री, एक जूनपासून पेट्रोल डिझेल महागणार

एकमत ऑनलाईन

महसूल काही प्रमाणात वाढण्याची आशा  : इंधनावरील अधिभारात प्रतिलिटर दोन रुपये वाढ करण्यात आली

मुंबई : चौथ्या लॉकडाऊनच्या शेवटानंतर ‘अनलॉक’च्या पहिल्या टप्प्यात प्रवेश करताना वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. महाराष्ट्रात येता सोमवार अर्थात एक जूनपासून पेट्रोल डिझेल महागणार आहे. इंधनावरील अधिभारात प्रतिलिटर दोन रुपये वाढ करण्यात आली आहे.

मुंबईत पेट्रोलचे दर 76.31 रुपयांवरुन 78.31 रुपयांवर जाणार आहेत. तर मुंबईतील डिझेल प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढून 68.21 रुपयांवर जाणार आहे. देशभरात लॉकडाऊन झाल्याने कमी झालेला महसूल भरुन काढण्यासाठी राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर दोन रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

Read More  अमित शहांचा कबुलीनामा; मरकज रोखला असता तर ही वेळच आली नसती

पेट्रोलवरील 26% आणि डिझेलवरील 24% ‘व्हॅट’शिवाय राज्य सरकार इंधनांवर उपकर (सेस) आकारते. सरकारने शनिवारी पेट्रोलवरील उपकर 8.12 रुपयांवरुन 10.12 रुपये प्रतिलिटरपर्यंत वाढवण्याची अधिसूचना जारी केली. तर डिझेलवरील उपकर प्रतिलिटर एकऐवजी तीन रुपयापर्यंत वाढणार आहे.

लॉकडाऊनमुळे सुरुवातीला जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक वगळता खासगी वाहनांना परवानगी नव्हती. हळूहळू खासगी वाहनांना सशर्त संमती देण्यात आली. आता प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात शिथिलता देण्यात येणार आल्याने खासगी वाहनांची सशर्त वाहतूक पुन्हा सुरु होईल.लॉकडाऊनच्या कालावधीत पेट्रोल डिझेल विक्री मोठ्या प्रमाणात घटल्याने महसूल आटला होता. आता इंधनदर वाढल्याने तिजोरीत महसूल काही प्रमाणात वाढण्याची आशा आहे

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या