21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रफडणवीस, कंबोज, शुक्ला यांच्यात गुप्तगू

फडणवीस, कंबोज, शुक्ला यांच्यात गुप्तगू

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या सागर बंगल्यावर मोठ्या घडामोडी सुरू आहेत. भाजप नेते मोहित कंबोज आणि आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला बुधवारी रात्री फडणवीसांच्या भेटीला पोहोचले.

रश्मी शुक्ला यांनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर १० मिनिटांनी मोहित कंबोज फडणवीसांच्या बंगल्यावर गेले. रश्मी शुक्ला आणि मोहित कंबोज यांची फडणवीस यांच्याशी संयुक्त भेट झाली नाही. पण या भेटीगाठींमुळे राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. कालच मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याबाबत ट्वीट करून खळबळ उडवून दिली होती.

रश्मी शुक्ला यांच्यावर महाविकास आघाडी सरकार असताना गंभीर आरोप करण्यात आले होते. २०१९ विधानसभा निवडणूक आणि सत्ता स्थापनेदरम्यान रश्मी शुक्ला यांनी नेत्यांचे फोन टॅप केले, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणी रश्मी शुक्ला यांना आरोपीही केले. रश्मी शुक्ला या सध्या हैदराबादमध्ये नियुक्तीवर आहेत. उद्या त्यांच्या फोन टॅपिंगची सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्यात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या