27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeसुरक्षारक्षकाने ताब्यात घेतले : अनोळखी इसमाचा तुळजाभवानी मंदीरात प्रवेश

सुरक्षारक्षकाने ताब्यात घेतले : अनोळखी इसमाचा तुळजाभवानी मंदीरात प्रवेश

एकमत ऑनलाईन

तुळजापूर : येथील श्रीतुळजाभवानी मंदीरात मंगळवार दि 9 रोजी सकाळी खाजगी सुरक्षा रक्षकांची नजर चुकवुन एक अनोळखी इसम भाविक मंदीरात दाखल झाल्याची घटना घडली. हा भाविक दाखल होताच सुरक्षारक्षकाने त्यास ताब्यात घेतले. ही घटना मंगळवार दि 9रोजी सकाळी 11.30वाजण्याचा सुमारास घडली.

या घटनेने ऐकच खळबळ उडाली आहे.या बाबतीत अधिक माहीतीअशी की, सध्या देशात वाहतुक खुली केल्याने खाजगी वाहनांनी भाविक मोठ्या संखेने तिर्थक्षेञ तुळजापूरात दाखल होत असुन असाच एक इसम भाविक मंगळवार दि 9रोजी ऐक भाविक मंदिरा समोर आला असता मंदीराचा राजे शहाजी महाद्वार येथील खाजगी सुरक्षारक्षकांची नजर चुकवुन मंदिरात गेला.

Read More  वाहतूक शाखेकडून बंधनकारक : रिक्षात ‘प्लॅस्टिक’ पडदा नसल्यास कारवाई

मंदिरतील सुरक्षारक्षकाने त्यास ताब्यात घेतले. सदरील इसमास निंबळकर दरवाजा पायऱ्या उतारताना ताब्यात घेतले. या घटनेची तात्काळ दखल घेतली गेली असुन प्रशासनाने या घटनेचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश दिला आहेया प्रकरणी सुरक्षा बाबतीत हलगर्जी पणा करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावरुन हटवले असल्याचे कळते. तसेच या प्रकरणी खाजगी सुरक्षारक्षक कंपनीने आपला अहवाल प्रशासनाला व पोलीसांना सादर केल्याचे समजते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या