नांदेड : येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या खून प्रकरणाचा पोलिस गतीने शोध घेत आहेतÞ त्याचा लवकरच उलगडा होवून सत्य काय ते समोर येईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नांदेड येथे माध्यमांशी बोलताना दिली.
दि. १४ मे रोजी नांदेड शहरात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी दाखल झालेले राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नांदेड परीक्षेत्रातील चारही जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्थेसंदर्भात नांदेड कौठा भागातील विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात बैठक घेतली. यावेळी त्यांनी परीक्षेत्रांतर्गत कशा पद्धतीने पोलिस काम करत आहेत. कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहील यावर गृहमंत्र्यांनी पोलिस अधिका-यांशी चर्चा केलीÞ
सदर बैठकीनंतर गृहमंत्री पाटील यांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संजय बियाणी खून प्रकरणाच्या तपासासंदर्भात ते म्हणाले की, मी आज संजय बियाणी यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन चर्चा केली. बियाणी खून प्रकरणाचा लवकरच या प्रकरणाचा उलगडा लागून सत्य काय ते सर्वांसमोर येईल, असा दावा केलाÞ नांदेडात येणा-या दहशतवाद्यांना पकडल्या संदर्भात विचारले असता त्यांनी सांगीतले की, सदर दशहतवाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा अधिक तपास एटीएस आणि स्थानिक पोलिस करीत आहेतÞ या विषयावर तपास सुरू असताना जास्त बोलणे योग्य नाही. या प्रकरणाशी संबंधीत सर्व गुन्हगारांची चौकशी केल्या जात आहे.