27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeशेतक-यांना बांधावरच बी बियाणे!

शेतक-यांना बांधावरच बी बियाणे!

एकमत ऑनलाईन

मुंबई : वृत्तसंस्था
शेतकºयांना बांधावरच बी बियाणांसाठी मिळावेत म्हणून ३ हजार शेतकरी गटांच्या मदतीने नियोजन सुरु आहे. ५४ हजार मेट्रिक टन बियाणे पोहोचविणे सुरु असून गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती मिळाली आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. तर मंत्रालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादाजी भुसे, अनिल देशमुख, मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, विश्वजित कदम उपस्थित होते.

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आपल्या सरकारला ६ महिने पूर्ण होत आहेत. एक चांगला अर्थसंकल्प मांडला आणि कोरोनाचा वेढा आपल्याला पडला. आज देशाचीच अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. अन्न धान्याच्या दृष्टीने बाजारपेठेचा अंदाज घेऊन महाराष्ट्र पुढील काळात काय करू शकतो ते पाहण्याची गरज आहे.कोरोनानंतर जग बदलणार आहे, अर्थातच त्यात कृषी क्षेत्राची भूमिका महत्वाची आहे. दर्जेदार पिक घेऊन मोठया प्रमाणावर निर्यात कशी होईल हेही आपण पहिले पाहिजे. पिक कर्जाबाबत रिझर्व्ह बँकेकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. शेतक-यांना वाºयावर सोडणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कापूस, ज्वारी, मका खरेदी सुरू
राज्यात ४१० लाख क्विंटल कापसाचे उत्पादन झाले. आतापर्यंत ३४४ लाख क्ंिवटल कापसाची खरेदी झाली. शिल्लक कापूस १५ ते २० जून पर्यंतखरेदी केला जाईल. १६३ कापूस खरेदी केंद्र कार्यरत. दररोज २ लाख क्ंिवटलपर्यंत कापसाची खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात ९८ हजार ९३३ शेतकºयांकडून ९ लाख क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आली आहे.

Read More  मद्यानंतर तंबाखूसाठी लागल्या लांबच लांब रांगा

राज्यात ज्वारी, मका, खरेदीसाठी ७५ केंद्र सुरू आहेत. त्यात २९ जिल्ह्यांचा समावेश आहे. उन्हाळी धान खरेदीसाठी २९३ खरेदी केंद्र असून, आतापर्यंत १ लाख क्ंिवटल धान्याची खरेदी करण्यात आली आहे. राज्यात विविध पिकांखाली एकूण खरीप क्षेत्र १४०़११ लाख हेक्टर आहे. यात सोयाबीन व कापूस ८२ लाख हेक्टर इतके आहे. शेतकºयांना बियाणांची गरज १६़१५ लाख क्विंटल आहे. तर बियाणांची उपलब्धता १७़०१ लाख क्ंिवटल इतकी आहे. सोयाबीन व कापूस या पिकांखाली खरीपाचे ६० टक्के क्षेत्र आहे, अशी माहिती आहे. मागच्या वर्षी तुरीत चांगली वाढ झाली. सोयाबीन आणि कापसातही मागच्या वर्षी चांगली वाढ असल्याची माहिती या बैठकीतून मिळाली आहे.

२०२० चा नैऋत्य मौसमी पाउस सरासरी ९६ % ते १०४ % टक्के राहील, असा अंदाज आहे. तर अल-निनो सामान्य राहणार. आॅगस्ट सप्टेंबरमध्ये सौम्य स्वरूपात अल निनोची स्थिती असेल. मान्सूनचे केरळला आगमन ५ जूनला होईल, असा अंदाज आहे. मौसमी पाउस राज्यात काहीसा उशिरा येईल. मुंबईत ११ जूनपासून पाऊस सुरु होईल; पण १८ जूनपर्यंत सर्व राज्यात पसरेल.

लॉकडाऊननंतर काय?
* लॉकडाऊन नंतर दररोज २ हजार टन भाजीपाला आणि फळे यांची ३२०० पेक्षा जास्त ठिकाणी उत्पादक ते ग्राहक थेट विक्री.
* ३७९० गटांमार्फत ९ लाख ६८ हजार ५५० क्विंटल फळे व भाजीपाला आॅनलाईन व थेट विक्री. यासाठी राज्यात ३२१२ थेट विक्री केंद्रे स्थापन.
* हापूस आंब्याच्या विक्रीसाठी कृषी व पणन विभागामार्फत प्रयत्न
* कृषी माल निर्यातीसाठी आवश्यक फायटोसेनिटरी प्रमाणपत्रे देण्यात येत आहेत.
* शेतमाल आणि कृषी निविष्ठा विक्रीसाठी आणि वाहतुकीसाठी परिवहन आणि गृह विभागाचे परवाने
* बहुतेक कृषी उत्पन्न बाजार समित्यातून शेतमालाची विक्री
* शेतकºयांच्या आॅनलाईन मार्गदर्शन व प्रशिक्षण
* जिल्ह्यातील सर्व बियाणे प्रक्रिया केंद्रे सुरु
* बियाणे उत्पादक कंपन्यांशी सातत्याने व्हीसीद्वारे संपर्क
* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचे जिल्हा आणि राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष
* शेतकºयांना बांधावरच बी बियाणे मिळावेत म्हणून ३ हजार शेतकरी गटांच्या मदतीने नियोजन.
* ५४ हजार मेट्रिक टन बियाणे पोहोचविणे सुरु. गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या