23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रआ. राणाला पाहताच पत्नीला अश्रू अनावर

आ. राणाला पाहताच पत्नीला अश्रू अनावर

एकमत ऑनलाईन

मुंबई : राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याला काल न्यायालयाने जामीन दिला. आज दोघांचीही तुरुंगातून सुटका झाली. नवनीत राणा यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने रवी राणा तुरुंगातून बाहेर येताच थेट लीलावती रुग्णालयात पोहोचले. तब्बल १२ दिवसांनी राणा पती-पत्नीची भेट झाली. यावेळी रवी राणांना पाहताच नवनीत राणा यांच्या अश्रूंचा बांध फुटला. रवी राणा यांनी नवनीत राणा यांना जवळ घेऊन धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रकृतीविषयी विचारणा केली. नवनीत राणा या भायखळा जेलमध्ये होत्या, तर रवी राणा हे तळोजा तुरुंगात होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या